चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी बस थांब्यावर धडकली

चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी बस थांब्यावर धडकलीपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

पुसद:तालुका प्रतिनिधी:

पुसद: येथील बस स्थानकावर अकोला साठी जाणारी गाडी आगारातून बस थांब्यावर लावताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी बस थांब्यावरील पिलरला जावून धडकली.

दि ३एप्रिल रोजी दुपारी ४वाजता पुसद वरून अकोला जाणारी गाडी चालक आगारातून वेगाने आणत असताना गाडी स्पिड बेकरवर आदळल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व गाडी बस थांब्यावरील पिलरवर जाऊन आदळली.संतोष तगडपल्लेवार नावाचा एक प्रवासी गाडी खाली आल्याने गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले आहे.बस स्थानकावर प्रचंड गर्दी असूनही सुदैवाने प्राणहानी टळली.

पुसद वरून अकोला जाणाऱ्या गाडीचा क्रमांक एम एच ४० वाय५५८१हा असून चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.वृत्त लिहीस्तोवर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नव्हती.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles