
कर्कश आवाजाच्या बुलेटवर वाहतुक पोलीसांची धडक कारवाई
प्रतिनिधी पुसद
पुसद: शहर तसेच उपविभागा मध्ये तरुण मुले, बुलेट गाडीचा कंपनीचा सायलेंसर बदलुन मोठा आवाज करणारा किंवा फटाके सारखा आवाज करणारा सायलेंसर बुलेट गाडीवर लावतात व शांतप्रिय वस्तीमध्ये जावुन तसेच मुख्य रस्त्यावर जावुन बुलेट गाडीला अती वेगाने चालवुन सायलेंसरचा खुप मोठ्या प्रमाणात आवाज करुन सर्व सामान्य जनतेस त्रास देतात. अश्याच मोठ्या आवाजाच्या बुलेट गाडीवर वाहतुक पोलीसांनी आजपर्यंत 10 बुलेट वर दंडात्मक कारवाई करण्यात आली तसेच सदर बुलेट गाडीचा मोठ्या आवाजाचा सायलेंसर बदलुन कंपनीने दिलेला सायलेंसर बसविण्यात आले. तसेच सर्व जनतेस विनंती किंवा आवाहन करण्यात येते की, तुमच्या आजुबाजुला अश्या बुलेट गाडीचा कंपनीचा सायलेंसर बदलुन मोठा आवाज करणारा किंवा फटाके सारखा आवाज करत असणा- या बुलेट गाडीचा नंबर वाहतुक पोलीसांना देण्यात यावी तसेच ज्यांच्याकडे अश्या मोठ्या आवाजाचे बुलेट गाडीवर सायलेंसर बसविले असतील तर त्यांनी तात्काळ स्वताहुण सायलेंसर बदलुन कंपनीचे सायलेंसर बसवुन घ्यावे अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल याबाबत सर्वांनी नोंद घ्यावी.
सदर कारवाई मा.डॉ पवण बन्सोड सा.पोलीस अधीक्षक यवतमाळ, पियुष जगताप सा अप्पर पोलीस अधीक्षक सा यवतमाळ, पंकज अतुलकर सा उपविभागीय पोलीस अधी तथा सहा. पोलीस अधीक्षक सा पुसद यांचे मार्गदर्शात स.पो.नि. ज्ञानेश्वर चव्हाण, पोउपनि वडते, ना. पो. गजानन हाळे, चालक पो.ना. योगेश गिरी यांनी केली.
राठोड, अतुल दातीर, अविनाश कदम, म.पो.ना. सुषमा राठोड, पो. कॉ. प्रफुल तामस्कर, संतोष गजभार, हरिदास