
बाजार समितीच्या निवडणुकीत शेवटच्या दिवशी नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड
_एकूण २२२ उमेदवारी अर्ज दाखल, शेवटच्या दिवशी १७४उमेदवारी अर्ज दाखल_
तालुका प्रतिनिधी, पुसद
पुसद: महाराष्ट्र राज्य पुणे महामंडळाच्या राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने निवडणुकीबाबत दि.२२ डिसेंबर २०२२ ला जीआर प्रसिद्ध केला होता.त्यानुसार राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणावर सोपविलेले अधिकाराचा वापर करत पुसद येथील बाजार समितीच्या निवडणुकीत नामांकन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.दि.३ एप्रिल २०२३ रोजी शेवटच्या दिवशी बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये १७४ उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची एकच झुंबड उडाली होती. तर एकूण २२२ अर्ज दाखल झाले आहे.बाजार समितीच्या निवडणुकीत उभे राहण्यासाठी २७२ अर्जाची विक्री झाली होती हे विशेष.
पुसदच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजपासोबत शिंदे व ठाकरे गट एकत्र आल्याचे पहावयास मिळाले आहे.काँग्रेस व राष्ट्रवादी हे स्वतंत्र निवडणूक लढणार असल्याचेही ऐकावयास मिळाले आहे.बाजार समितीच्या संचालक मंडळात उभ्या राहणाऱ्या उमेदवारात त्रिशंकू लढत होणार असल्याचे संकेत दिसू लागले आहेत.पुसदच्या बाजार समितीची सुमारे दहा वर्षांपासून निवडणुका झाल्या नव्हत्या.बाजार समितीची निवडणूक घ्या यासाठी आंदोलने देखील झाली होती.यंदा बाजार समितीच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्याने इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून २२२ अर्जदारांचे उमेदवारी अर्ज सहाय्यक निबंधक सहकारी कार्यालयाला प्राप्त झाले आहेत. अर्जांची छाननी दि ५एप्रिल रोजी होणार असून उमेदवारी मागे घेण्याची तारीख दि ६एप्रिल ते दि २०एप्रिल आहे.चिन्ह वाटप दि २१एप्रिल व मतदान दि २८एप्रिल ला होणार आहे.
*असे प्राप्त झाले बाजार समितीचे नामांकन अर्ज*
सहकारी संस्था मतदार संघ
सर्वसाधारण 88,
महिला राखीव 12,
,इतर मागासवर्गीय 6,
विजा भ.ज 13,
ग्रामपंचायत मतदार संघ:
सर्वसाधारण 53,अनुसूचित जाती जमाती 19,आर्थिक दृष्ट दुर्बल घटक 12,व्यापारी अडते मतदारसंघ 14,हमाल मापारी व तोलारी मतदारसंघ 05