
घे भरारी
बंद पाषाण तोडून टाक तू
स्वच्छंदी जगण्यासाठी
तोडून बंद सारे घे भरारी
स्वप्नांची पूर्ती करण्यासाठी
प्रेरणा तुझ्या जीवनाची
शक्तीची तू स्वामिनी
आत्मविश्वासाने लढ तू
मोहजाळ तोडून घे तू रागिणी
आजची नारी सर्वात भारी
ओळख तुझ्या गुणांना
उमट तू ठसा सावित्रीबाईचा
आहेस तू जागांची मानिनी
इतिहासाची आहेस मूर्ती
तुझ्याकडे आहे सहनशक्ती
माय माऊली वात्सल्याची
प्रेम अन् ममतेची भक्ती
अडचणींना तोंड देत
तू अस्तित्व तुझे टिकव
अत्याचारी माणसांना
तूच आता धडा शिकव
स्वयंप्रकाशान घे भरारी
बसू नकोस निराशात आता
नारी शक्तीचा असेल विजय
हे उंच भरारी आता,…
सौ.कुसुम पाटील कसबा बावडा कोल्हापूर
=======