असू दे कल्पनेतचं

असू दे कल्पनेतचं



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

असू दे ते कल्पनेतले जग,
तिथे रमते वेडे मन
खऱ्या जगात तुटून पडते,
काचळ्यात विखरते मन
छोटी छोटी ती स्वप्नांची बाग,
त्यात भावनांना असतो वाव
कोणी दुखवायला नसतं तिथे,
ना बसतो कुणाचा कुणावर घाव
नको त्या खोट्या वलग्ना,
नको ती खोटीचं शब्दांची भुरळ,
आसवांचे नको ते डोळ्यात चाळे,
नको ती दबलेली भावनेची गरळ
मन फुलपाखरू होऊन उडते,
कल्पनेचे पंख लावून भिरभिरते,
तुझं माझं नसत ना त्यात फक्त,
आर्ततेची हाक मनातून निघते
किती मोहक कल्पनेचे मनाच्या,
अंगणात घातलेले सडे
मन तिथेच धावते जिथे बसतात,
आपल्यांकडूच जीवाला तडे
आता नाही भुलत मन पूर्वीसारखं,
त्यालाही कळूनच चुकलयं म्हणा
आपलं परकं शोधतं तेही कळतात,
त्यालाही आपल्यातल्या अनोळखी खुणा.

सौ.सविता वामन ठाणे.
=====

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles