
स्त्री उद्धारक
ज्ञानदीप घेऊन हाती
स्त्री उद्धारक हे जन्मले
क्रांती सूर्य ज्योतिरावांना
बाबासाहेबांनी गुरु केले ||
स्त्री मुक्तीचा ध्यास घेऊन
सावित्रीला साक्षर केले
मुलींच्या शिक्षणासाठी
ज्योती अहोरात्र झटले ||
घेऊन सोबत सावूला
मुलींना शाळेत आणले
तत्कालीन प्रस्थापितांनी
क्रांतीचे पाऊल हे जाणले ||
स्त्री उद्धारक ज्योतिराव
संकटांनाही ना हरले
बहुजनांचे कैवारी हे
कर्तृत्वाने अमर राहिले….
कर्तृत्वाने अमर राहिले…..||
दत्ता काजळे ‘ज्ञानाग्रज’
उमरगा जि.उस्मानाबाद