
कसोटी संयमाची
भोग,दुःख,अश्रू मीच का प्यावी.?
कसोटी संयमाची मीच का द्यावी.?!धृ!
प्रारब्धने माझ्यासोबत डाव रचला आहे.
नियतीनेही हसून खेळ मांडला आहे.
सोंगट्याची भूमिका मीच का वठवावी.?
कसोटी संयमाची मीच का द्यावी.?!1!
ताकद पणाला लावून जिद्दीने लढते.
कितीदा पडले तरी नव्या दमाने उठते.
संघर्षाच्या लढ्यात मी का माघार घ्यावी.?
कसोटी संयमाची मीच का द्यावी.?!2!
मुक्त आभाळ मला काबीज करायचे आहे.
चेहऱ्यावर हास्य ठेवून दुःख लपवायचे आहे.
सुखाने येता येता हुलकवणी का दयावी.?
कसोटी संयमाची मीच का द्यावी.?!3!
प्राजक्ता आर खांडेकर
सुगत नगर नागपूर
=======