आकांत..

आकांत..पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

वाटतो जरी सर्वांना, मी वरून अगदीच निवांत
पर कळेना कुणालाही, माझ्या आतला आकांत..//

भळभळत्या जखमांचा, दाह छळतो अतोनात
करावी कुठे वाच्यता, मीठ प्रत्येकाच्या हातात..//

नाही सांत्वनाचे मलम, नाहीच आधाराचे शब्द
घातक वाग्बाणांनी मात्र, अंतःकरण होते दग्ध.. //

घोर अभिशापाची, जाचणी लागलीय जीवाला
आसवांचाच अभिषेक, रोज घालतोय शिवाला.. //

मन होरपळतेय आगीत, जसे शुष्क वेलीचे पान
कधी पडावे या ओंजळीत, आता उःशापाचे दान..//

पूर्वसंचिताचा खेळ म्हणू की, म्हणू प्रारब्ध भोग
ना जाणो कसा उणा पडला, निस्सीम कर्म योग.. //

पुरे पुरे झाली देवा, किती घेशील कठोर परीक्षा
डोळ्यात आले प्राण, अजून किती करू प्रतिक्षा.. //

विष्णू संकपाळ बजाजनगर औरंगाबाद
÷======

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,877FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles