
अद्भूत गणित
गणितात कोणत्याही संख्येला १ ते १० पर्यंतच्या सर्व संख्यांनी भागता येत नाही. पण ही एक संख्या अशी विचित्र आहे की जगातले सर्व गणितज्ञ आश्चर्याने चकित झाले. ही संख्या भारतीय गणितज्ञांनी आपल्या अचाट बुद्धीने शोधली…!
ही संख्या आहे २५२० . पहा ही इतर अनेक संख्यांपैकी एक आहे असेच दिसते पण, वास्तवात मात्र तसे नाही. या संख्येने जगातील अनेक गणितज्ञांना थक्क करून सोडले…!!
ही विचित्र संख्या १ ते १० यापैकी प्रत्येक संख्येने भाग जाणारी आहे, ती संख्या सम वा विषम असली तरीही.
ह्या संख्येला १ ते १० पर्यंतच्या कोणत्याही संख्येने भागले असता बाकी शून्यच राहते. खरोखरच ही अद्भूत व अशक्य अशी संख्या वाटते…!!
आता पुढील भागाकार पहा व वरील विधानाची सत्यता स्वतः अनुभवा.
२५२० ÷ १ = २५२०
२५२० ÷ २ = १२६०
२५२० ÷ ३ = ८४०
२५२० ÷ ४ = ६३०
२५२० ÷ ५ = ५०४
२५२० ÷ ६ = ४२०
२५२० ÷ ७ = ३६०
२५२० ÷ ८ = ३१५
२५२० ÷ ९ = २८०
२५२० ÷ १० = २५२
२५२० या संख्येचे रहस्य [ ७ × ३० × १२] या गुणाकारात दडले आहे.
भारतीय हिंदू संवत्सराच्या अनुषंगाने या २५२० संख्येचे कोडे उलगडते,जे या संख्येचे गुणाकार आहे.
एका आठवड्याचे दिवस (७),
एका महिन्याचे दिवस (३०) व
एका वर्षाचे महीने (१२)
(७ × ३० × १२ = २५२०)
हेच आहे भारतीय कालगणनेचे वैशिष्ट्य व श्रेष्ठत्व!!
: शून्य
स्वतःसाठी असणारा
स्वतःमध्ये जगणारा
स्वतःच गुरफडणारा
मागे राहून साथ देणारा
सगळ्यांची किंमत करणारा
शून्य
परिघात राहणारा
व्यासात मोजणारा
त्रिज्येत विभागणारा
सोबतीत चालणारा
नशीब बदलणारा
शून्य
एकटाच असताना पुढे
सगळ्या सोबत मागे
त्याच्याविना सर्वच अपूर्ण
तरीही तोच का पुर्ण ???…… ….
डॉ. ज्ञानेश्वर माशाळकर, धाराशिव
======