
चांदण्याची ओंजळ
चांदण्याची ओंजळ
मोकळ्या आकाशात
उजळून दिसते पहा
या लख्ख प्रकाशात||१||
चंद्राच्या सोबतीला
चांदण्या या सुंदर
प्रकाश चांदण्याचा
सोबती निरंतर||२||
चमचम चांदण्या
माझे हरवी भान
चांदण्याची ओंजळ
कशी दिसते छान||३||
सुंदरशा रातीला
सजतसे आकाश
अंगणी पसरला
असा लख्ख प्रकाश||४||
रात्रीच्या अंधारात
आकाश सजलेले
छान लुकलुकत्या
ताऱ्यांनी भरलेले||५||
चांदण्याची ओंजळ
आकाश हे खुलवी
तुझ्या आठवणीत
मन माझे भुलवी||६||
विनायक कृष्णराव पाटील बेळगाव
=======