
युनियन बँकेच्या शाखा व्यवस्थापकाने शेतकऱ्याला अपमानित करीत बँकेबाहेर काढले
_युनियन बँकऑफ इंडियाच्या शाखा व्यवस्थापकाचा प्रताप_
पुसद तालुका प्रतिनिधी
पुसद: येथील युनियन बँक ऑफ इंडियाच्या शाखेत एक शेतकरी पिक कर्जाबाबत चौकशी करण्यासाठी गेला असता शाखा व्यवस्थापकाने त्यांच्याशी उद्धटपणा ची वर्तणूक करून अपमानित करून बँकेच्या बाहेर हाकलून दिले याबाबत सदर शेतकऱ्याने उपविभागीय अधिकारी यांचेकडे तक्रार दाखल केली आहे.
युनियन बँक ऑफ इंडिया शाखा पुसद येथे दि.११एप्रिल रोजी दुपारी १.३०वाजता दरम्यान संतोष नंदकिशोर जामकर रा.मारवाडी हा शेतकरी पीक कर्जाबाबत चौकशी करण्यासाठी गेला असता तेथील सुरक्षा रक्षकाने त्याला शाखा व्यवस्थापकास भेटण्यास मज्जाव केला.सुरक्षा रक्षकासोबत संतोष जामकर यांची बाचाबाची झाली.त्यामुळे शाखा व्यवस्थापक यांनी सुरक्षा रक्षकास सांगितले की याला बँकेच्या बाहेर हाकलून लावा.सदर शेतकऱ्याने शाखा व्यवस्थापकास विनंती केली तरीही ते न ऐकल्याने अपमानित होऊन संतोष जामकर हे बँकेतून निघून आले.
याप्रकरणी संतोष जामकर यांनी दि११एप्रिल रोजी उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या कडे तक्रार दाखल केली असून शाखा व्यवस्थापकाची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे.याप्रकरणी न्याय न मिळाल्यास उपोषणास बसणार असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
मी माझ्या केबिनमध्ये बसून होतो.सदर शेतकरी दुसऱ्याचा अर्ज घेऊन रांगेमध्ये उभा होता.कर्मचारी सगळे फुकटची पगार घेतात अशाप्रकारे सदर शेतकरी मोठं मोठ्याने बोलत होता.मी अर्ज बघीतला असता तो अर्ज दुसऱ्याचा होता.ज्याचे काम आहे तेच आता थांबा असे मी सांगितले.या सर्व प्रकरणाची शहानिशा करण्यासाठी आमच्या बँकेत सि.सि.टी.व्ही.कैमेरे आहेत.