
आधुनिक भारताचे शिल्पकार – बाबसाहेब आंबेडकर!
पुसद तालुका प्रतिनिधी
पुसद- सम्राट अशोक, महात्मा ज्योतीबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतनिमित्त आयोजित धम्म क्रांती प्रज्ञा पर्व 2023 चा आज चौथ्या दिवशी संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते प्रा. प्रवीण देशमुख राष्ट्र उभारणीत बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान या विषयावर भाष्य केले. समता महिला मंडळ अशोक पार्क आणि धम्मचक्र महीला मंडळ आदर्श नगर यांनी बुद्ध वंदना घेवून कार्यक्रमाची सुरवात झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुधीर देशमुख होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून शंकर पांचाळ ठाणेदार शहर पोलिस स्टेशन, दिगंबर जगताप, डॉ. अकील मेमन, संजय एडतकर, मनीष शाह, नितीन पवार, विजय जाधव, बबलू
मळघने, किशोर मुजमुले, अरूण मनवर, विलास भवरे, समाधान धूळधुळे, प्रकाश झळके, कपिल वासनिक, प्रभाकर टेटर, पांडुरंग व्यवहारे, दिनेश खांडेकर आदी उपस्थित होते.
बाबासाहेब आंबेडकरांचे कर्तुत्व, विचार खूप व्यापक आहेत. एक षडयंत्र पूर्वक बाबासाहेबांना फक्त अनुसूचित जातीचे उद्धारक एवढा संकुचित प्रचार केल्या गेला. बाबासाहेबांचे व्यक्तिमत्त्व उतुंग होते. असा एकही विषय, शास्त्र नाही ज्यात बाबासाहेब आंबेडकरांना प्रभुत्व न्हवते. इतिहास, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, मानववंश शास्त्र, कृषी विज्ञान, समाज शास्त्र अशा अनेक विषयांवर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रभुत्व मिळवले होते. भारतात लोकशाही प्रस्थापित होण्यासाठी ज्या संस्थांचा विकास होणे आवश्यक आहे त्यात महत्त्वाची मध्यवर्ती रिझर्व बँक बाबासाहेबांच्या संकल्पनेवर स्थापन झाली.
भारतीय घटनेचे पितामह बाबासाहेब आहेत. आज या देशात जी लोकशाही नांदत आहे. त्याचा पाया बाबासाहेब आंबेडकर यांनी रचला आहे. कामगारांचे हक्क आणि जमीनदारांचे उच्चाटन करण्याचे काम बाबासाहेब आंबेडकर यांनी केले आहे. मोठ मोठी धरणं आणि जलविद्युत प्रकल्प बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजनातून उभे रहाले आहेत. भारतीय गरिबीचा प्रश्न, भारताचे परराष्ट्र धोरण, भारताचे औद्योगिक धोरण, भारतीय अर्थव्यवस्थेचे स्वरूप. महीला, अनुसूचित जाती जमाती, इतर मागास प्रवर्ग यांच्या विकासा साठी बाबासाहेब आंबेडकर यांनी दूरदृष्टी दाखवून संविधानात तरतुदी करून ठेवल्या. आज पर्यंत भारताचा जो विकस झाला आहे त्याची दृष्टी ही बाबसाहेब आंबेडकरांची आहे. म्हणुन बाबसाहेब अंबेडकर हेच आधुनिक भारताचे निर्माते आहेत. या कार्यक्रमाचे निवेदन परमेश्वर खंदारे यांनी तर आभार संतोष गायकवाड यांनी मानले
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी किशोर कांबळे नत्तुजी वाहुळे नारायण ठोके, नितेश खंदारे, संतोष गायकवाड, अंबादास वानखेडे, प्रफुल भालेराव, विष्णू सरकटे, परमेश्वर खंदारे, प्रीतम आळणे, राजू पठाडे, समाधान केवटे, जगदीश सावळे, मुन्ना. हाटे, संजय वाढवे, प्रा. सुनील खाडे, विकास मनवर, साहेबराव गुजर, सुरेश कांबळे, बाळासाहेब कांबळे, अंबादास कांबळे, मधुकर सोनोने, दिनेश सावळे,रंगराव बनसोड आदी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले