स्री भ्रूणहत्या

स्री भ्रूणहत्यापुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

उदरात घडताना जीव
भ्रांत ती नव्हतीच उद्याची
स्वप्न पाहती निष्पाप जीव 
कळी कोवळी उमलण्याची…/१/

स्वागतास तुझ्या नाही सज्ज 
कन्या असता लागे चाहूल 
नाही खुलली नाही फुलली 
हत्या करण्या पडे पाऊल ../२/

लागे कुलवंशालाच दिवा 
लेक म्हने दुसऱ्याचे धन 
कुस्करून तिला उदरात 
नाही जाणिले तिचे ते मन../३/

कोमेजली कळी बघताना 
गगनास भिडता किंकाळी
माता ती आर्जव करताना
विरहाचे दुःख तिच्या भाळी. ./४/

मुलासाठी करिता नवस
आशा अमाप असता खोटी
लाभतास शूर वीरांगणा
वाटे कन्यारत्न यावे पोटी../५/

भेदभाव तो मुला मुलीचा
कूस होताच तिची निरंक 
पाप घडले त्याच हाताने
लागे “स्त्रीभ्रूणहत्या कलंक”../६/

रेखा सोनारे
नागपूर
सदस्या मराठीचे शिलेदार समूह

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,877FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles