
सहकारी शेतकी खरेदी विक्री संस्थेच्या अध्यक्ष उपाध्यक्षाची निवड
पुसद तालुका प्रतिनिधी
पुसद: येथील पुसद सहकारी शेतकी खरेदी विक्री समिती मर्या. पुसद र.नं. 358 या संस्थेची सन 2022-23 ते सन – 2027-28 च्या पाच वर्षाकरीता अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाकरीता निवड दिनांक 12/04/2023 रोजी होती.
13 संचालका पैकी धनंजयभाऊ गुरुनाथ डुब्बेवार यांनी अध्यक्ष पदाकरीता नामनिर्देशन पत्र दाखल केले. व उपाध्यक्ष पदा करीता श्री. सुभाष शंकरराव देशमुख यांनी नामनिदेर्शन पत्र भरले. व मा. अध्यासी अधिकारी श्री. एस. एस. भालेराव सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, पुसद यांच्याकडे दाखल केले. मा. भालेराव साहेबांनी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदा करीता एक एकच पत्र आल्याचे सभेत जाहीर केले. त्यामुळे अध्यक्ष पदी मा. श्री. धनंजय गुरुनाथ डुब्बेवार यांची अविरोध निवड झाली असे घोषीत केले. व तसेच श्री. सुभाष शंकरराव देशमुख यांची अविरोध उपाध्यक्ष पदी निवड झाली असे सभेला सांगुन निवडुन आलेले अध्यक्ष व उपाध्यक्ष आणि संचालक मंडळ यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सदर सभेला मा. श्री. विजयराव चव्हाण साहेब, श्री. सदबाराव मोहटे साहेब, श्री. बि. जी. राठोड सर, श्री. जाबुवंतराव राठोड साहेब, श्री. नामदेवराव मारकड साहेब, श्री. सैय्यद नायब साहेब, श्री. सुभाष जाधव साहेब, श्री. अवधुतराव मस्के पाटील, श्री. अनिल इंगळे, श्री. नथ्थु चव्हाण हे मान्यवर उपस्थीत होते. यांनी नविन संचालक मंडळाचा अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा सत्कार केला.
अध्यक्ष श्री. धनंजयभाऊ गुरुनाथ डुब्बेवार व उपाध्यक्ष श्री. सुभाष शंकरराव देशमुख यांनी सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयाला हार टाकुन व मा. स्व. वसंतरावजी नाईक तसेच स्व. सुधाकरराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पन करुन आलेल्या मान्यवरांचे आभार मानले.
तसेच नविन संचालक मंडळ व अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी संस्थेची परिस्थीती सुधारवण्यास कार्य करावे असे मा. श्री. विजयराव चव्हाण साहेबांनी सांगीतले. नविन संचालका पैकी श्री. धनंजय गुरुनाथ डुब्बेवार, श्री. परसराम राठोड, श्री. बबन जाधव, श्री. चंद्रशेखर ठाकरे हे संचालक या आदीच्या संचालक मंडळामध्ये होते. त्यांनी त्यांच्या अनुभवाच्या जोरावर आपल्या संस्थेचे जुने वैभव वापस आणण्यास प्रयत्न करुन असे सर्वांना सांगीतले. मा. अध्यक्ष महोदय श्री. धनंजय गुरुनाथ डुब्बेवार यांनी असे सांगीतले की, “मा. मनोहरराव नाईक व मा. श्री. विजयराव चव्हाण यांनी आमच्यावर जो विश्वास दाखुन आम्हाला ईथे आणले. तो पुर्णत्तवावर नेण्याची जबाबदारी आमची आहे. तसेच मा. श्री. ययातीभाऊ नाईक व मा. आ. इंद्रनिलभाऊ नाईक यांच्या मार्गदर्शना खाली कार्यकरुन आपल्या संस्थेला वैभव शिखरावर नेण्यासाठी आपण सर्वजन प्रयत्नाची परीकाष्ठा करु. आपण संस्थेच्या कार्यासाठी तत्पर राहु तसेच आपल्या तालुक्यातील शेतकरी वर्गाच्या हितासाठी कार्यकरु.”
नवीन संचालक मंडळ पुढीलप्रमाणे
अ.क्र. संचालकांचे नांव पद
1 श्री. धनंजय गुरुनाथ डुब्बेवार अध्यक्ष
2 श्री. सुभाष शंकरराव देशमुख उपाध्यक्ष
3 श्री. परसराम रामसिंग राठोड संचालक
4 श्री. बबन मनिराम जाधव संचालक
5 श्री. आयुब खान युसूफ खान संचालक
6 श्री. अजय उत्तमराव चव्हाण संचालक
7 श्री. मधुकर रामराव जाधव संचालक
8 श्री. संतोष तुकाराम दुधाने संचालक
9 श्री. अमोल दत्तराव साखरे संचालक
10 श्री. सुभाष किसन कांबळे संचालक
11 श्री. चंद्रशेखर संभाजी ठाकरे संचालक
12 सौ. आशा भानुदास कदम संचालीका
13 श्रीमती चंद्रकला रामराव इंगळे संचालीका