
माझा नकार नाही
माझ्या कधी हिताचा, केला विचार नाही
या वेदनांनो आता, माझा नकार नाही…
असतात मुखवटे जे, गोंडस..गोड..हसरे
त्यांनाही ओळखावे, इतकी हुशार नाही…
शब्दांचे वार आता, बहु झेलेले जीवाने
सांत्वना ती कुणाची, मज लागणार नाही..
माझ्यात तूच आहे, दुसरं कुणी कशाला
तुझ्याशिवाय मजला, कोणी स्वीकार नाही…
सरींवर सरी कोसळती, केवळ तुझ्या स्मृतींच्या
ओले शिवार झाले, पण ओठी चकार नाही…
तो चंद्र दूर आहे, गर्दीत तारकांच्या
डोळ्यांत प्रेम वाहे, आता माघार नाही…
पाहून घ्यायचे मज, डोळे भरून जग हे
सर्वस्व वाहू दे मज, बाकी उधार नाही…
या वेदनांनो आता, माझा नकार नाही …
*माझा नकार नाही…*
*सौ. विशाखा अरुण चांदेवार,नागपूर.*