
कॉमेडीयन सुनील पाल उद्या नागपुरात
_सुनील पाल यांच्या हस्ते ‘रेनबो स्टार फिल्म अकॅडमी’चे उद्घाटन_
_नागपूरकर ज्युनीयर शाहरूख खान प्रशांत वालदेही उपस्थित राहणार_
नागपूर: ओम श्री साईराम बहुउद्देशीय शिक्षण संस्था राजापेठ हुडकेश्वर नागपूर येथे रविवार 16 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता ‘रेनबो स्टार फिल्म अॅकॅडमी’चे उद्घाटन प्रसिद्ध विनोदी कलाकार व अभिनेते सुनील पाल यांच्या हस्ते होणार आहे.
यावेळी अभिनेता ज्युनियर शाहरुख खान आणि प्रशांत वालदे (मुंबई) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे आयोजन प्रेम काळबांडे, पूजा कावरे आणि जयश्री क्षीरसागर यांनी केले आहे.