जाऊ नको ग आई..?

जाऊ नको ग आई..?



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

जाऊ नको ग आई तू, अर्ध्यात सोडूनी
लेक तुझी रडते , बघ हात जोडूनी

काळ कसा तुझ्या, कुशीत होता बसुनी
नऊ महिन्यांपासून, हळुच होता टपूनी
काळजाचा ठोका आता, दे ग तू जपूनी
जाऊं नकोस आई तू, अर्ध्यात सोडूनी

मोजतोय धनी तुझा , ऐकक श्वास निसटणारा
रडतोय तो ठायीठायी, बघ डोळे उघडून जरा
कुठे विकत मिळेल, श्वास तुझा आणतो घेऊनी
जाऊ नकोस आई तू, अर्ध्यात सोडूनी

सहा वर्षांची चिमणी तुझी, बघते वाट दारापाशी
आई येईल माझी,घास भरवेल, मी आहे उपाशी
परत ये एकदा आई, तू मृत्यूला झुंजावूनी
जाऊ नकोस आई तू,अर्ध्यात सोडूनी…

✍🏼 *सारिका डी गेडाम, चंद्रपूर*
*सदस्य मराठीचे शिलेदार समुह*

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles