
शंकर नगर येथील नागरिकांचा आगामी होणाऱ्या सर्व निवडणुकांवर बहिष्कार
_कोणत्याही प्रकारची विकास कामे न झाल्याचे नागरिकांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन_
पुसद तालुका प्रतिनिधी:
पुसद: येथील शंकरनगर हा शहरातील जुना प्रभाग असून या प्रभागात अनेक वर्षांपासून विकासाची कामे झालेली नाहीत. वारंवार तक्रारी करून सुद्धा न.प. प्रशासनाने याबाबत कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही.त्यामुळे नागरीकांनी येणाऱ्या पुसद न.प. च्या निवडणूकीत व होणाऱ्या आगामी सर्व निवडणुकात मतदानावर जाहिर बहिष्कार टाकण्याचे निवेदन नुकतेच जिल्हाधिकारी यांना दिले आहे.
न.प.क्षेञातील शंकर नगर, प्रभाग क्रं. १४ ( आणि सध्याचा १५) मध्ये गेल्या निवडणूकीत या प्रभागातून तिन नगरसेवक आणि (जनरल) अध्यक्ष चार प्रतिनिधी नगर परिषदेचा कारभार करण्यासाठी निवडून दिलेले होते. त्या मध्ये एक नगर सेवक शिवसेना आणि दोन नगर सेवक भाजप चे होते. नगराध्यक्ष सौ. अनिताताई नाईक ह्या ही प्रतिनीधी होत्या त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आहेत.
सदर प्रभागात शंकरनगर नावाची खूप जूनी वस्ती आहे. शहरातील सर्वात शिक्षीत नागरीक येथे राहतात. तसे शंकरनगर विस्ताराने फार मोठे नाही.
या परीसरातील नागरीक जवळ-जवळ शंभर टक्के कर भरतात.
या भागात सुमारे विस वर्षापूर्वी नाल्या आणि रस्त्याची कामे झालीत. ही कामे आता जुनी होऊन त्यांचे नविनीकरण करण्याची वेळ कधीच निघून गेली. पावसाळ्यात रस्त्याची अवस्था फारच बिकट असते. विस वर्षा नंतर मागील ५-६ वर्षात ही कामे होण्यासाठी येथील नागरिकांनी अर्ज विनंत्या केल्या आणि प्रत्यक्ष भेटी घेउन सुद्धा कोणतीही कामे झालेली नाहीत. (किबहुना मुद्दाम केलेली नाहीत). एवढेच काय तर पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुद्धा बरोबर होत नाही. शंकरनगर ला लागून असलेल्या चहूबाजूच्या एरीया मध्ये लख्ख कामे होऊन गेलीत.
आगामी काळात जोपर्यंत ही कामे
होत नाहीत तो पर्यंत ज्या-ज्या निवडणूका होतील त्या-त्या निवडणूकां मध्ये आम्ही सर्व नागरिक बहिष्कार टाकू. शंकर नगर येथील सर्व नागरिकांनी असा निर्धार केला आहे की, जो पर्यंत शंकरनगर मधील सर्व कामे पूर्ण होणार नाही तोपर्यंत कोणत्याही परीस्थितीत कोणीही मतदान करणार नाहीत अशा प्रकारचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
हा कोणताही राजकीय पक्षाचा अजंडा नसून आक्रोश आंदोलन आहे असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.निवेदनाच्या प्रति मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य, मुंबई, प्रशासक तथा अ. जिल्हाधिकारी पुसद, मुख्य अधिकारी, नगर परीषद, वि. तहसिलदार पुसद, आमदार इंद्रनिल नाईक, आमदार निलय नाईक, आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.