
महाडचा मुक्तीसंग्राम ही भारताच्या इतिहासातील पहिली मानवी हक्कांची लढाई- न्या. डॉ. यशवंत चवरे
तालुका प्रतिनिधी, पुसद
पुसद- सम्राट अशोक, महात्मा ज्योतीबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतनिमित्त आयोजित धम्म क्रांती प्रज्ञा पर्व 2023 चा आज सातव्या दिवशी मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्याय मूर्ती डॉ. यशवंत चवरे यांच्या अभ्यासपूर्ण विवेचनाने संस्मरणीय ठरला. यावेळी मोठ्या संख्येने कायद्याच्या क्षेत्रातील मंडळी उपस्थीत होती.
जगात धर्मसत्ता विरुद्ध मानवी हक्क ही लढाई निरंतर आहे. धर्माच्या ठेकेदारांनी नेहमी आपल्या भल्यासाठी समजातील. एका मोठ्या वर्गाचे अधिकार नाकारले आहेत. भारतात चातुर्वर्ण्य धर्म व्यवस्थेत शूद्र या सर्वात मोठ्या वर्गाला जीवन जगण्याचे कुठलेच अधिकार न्हवते त्यामूळे महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाला ऐतिहासिक महत्व आहे.
शूद्रांना सार्वजनिक पाणवठ्याच्या ठिकाणी इतरांप्रमाणे पाणी भरण्याचा अधिकार न्हवता. शूद्रांना फक्त पिण्याच्या पाण्याची सोय करायाची न्हवती तर समान अधिकार हवे होते.
महाडचा मुक्तीसंग्राम ही फक्त एक आंदोलन नाही तर कायदेशीर लढाई पण आहे. बाबासाहेबांनी समतेचा हा अधिकार न्यायालयीन लढाई लढून स्थापित केला आहे. बाबासाहेबांनी आपल्या कायद्याच्या अभ्यासाने सगळ्यांना प्रभावित करुन टाकले होते. चवदार तळ्याचा जो संगर झाला तो खऱ्या अर्थाने कायदेशीर मानवी हक्कांचा पहिला भारतीय लढा आहे आणि त्याचे महत्व आपल्या इतिहासात उल्लेखनीय स्वयं दीप महिला मंडळ सुदर्शन नगर आणि संघमित्रा महिला मंडळ साई विहार कवडीपुर यांनी बुद्ध वंदना घेवून कार्यक्रमाची सुरवात झाली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. निलय नाईक नाईक होते तर विशेष अतिथी म्हणून पुसद पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय राठोड, ऍड. आशिष देशमुख हे होते त्यावेळी प्रमूख पाहूणे ऍड. विवेक पांडे, अनिरुध्द पाटील, ऍड. पद्माकर विघ्ने, साहेबराव कांबळे, ऍड
आरिफ अहमद, ऍड. योगेश दिवेकर, ऍड. विश्वास भवरे,ऍड. वाय. एन. जांभूळकर, बुद्धरत्न भालेराव, ऍड. अर्जुन राठोड, सायली मनवर, प्रा. वर्षा भडांगे, नेहा खंदारे आदि उपस्थीत होते. कार्यक्रमांचे निवेदन नारायण ठोके यांनी तर आभार अंबादास कांबळे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी किशोर कांबळे नत्तुजी वाहुळे नारायण ठोके, नितेश खंदारे, संतोष गायकवाड, अंबादास वानखेडे, प्रफुल भालेराव, विष्णू सरकटे, परमेश्वर खंदारे, प्रीतम आळणे, राजू पठाडे, समाधान केवटे, जगदीश सावळे, मुन्ना. हाटे, संजय वाढवे, प्रा. सुनील खाडे, विकास मनवर, साहेबराव गुजर, सुरेश कांबळे, बाळासाहेब कांबळे, अंबादास कांबळे, मधुकर सोनोने, दिनेश सावळे,रंगराव बनसोड आदी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले