भीमजंयती

भीमजंयतीपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

आली हो आली हो भीमजयंती आली हो
चला चला सयानो बुद्धविहारी जाऊ हो… || धृ ||

उगविली आज ती सोनियाची सकाळ
आटोपून घ्या काम लवकर नको लावा वेळ
निळ्या छताखाली जमली निळी पाखरे हो..
चला चला सयानो बुद्धविहारी जाऊ हो… || १ ||

भीमाईच्या पोटी एक मिसीहाने जन्म घेतला
दिव्याच्या रोषनाईने महूगाव हा उजाळला
मुखावरील तेज तो पाहून हर्ष मनी झाला हो
चला चला सयानो बुद्धविहारी जाऊ हो… || २ ||

नव्हाता आमचा वाली होतो आम्ही अंधारात
वैचारिक क्रांती करून आणले आम्हा माणसात
तुझ्याचमुळे भिमबाबा घेतोया मोकळा श्वास हो..
चला चला सयानो बुद्धविहारी जाऊ हो… || ३ ||

विषमतेची दरी मिटवून समान हक्क अधिकार दिले
स्वाभिमानाचे जीवन जगणे त्यांनी शिकविले
म्हणूनच आम्ही घरी सुखाने खातो घास हो
चला चला सयानो बुद्धविहारी जाऊ हो… || ४ ||

चराचरात आहे माझ्या भिमबांबाचा वास
विहारी दूरदूरचे निळी पाखरे जमली खास
त्या रक्तविहीत क्रांतीची विश्व देती ग्वाही हो
चला चला सयानो बुद्धविहारी जाऊ हो… || ५ ||

सुधा अश्वस्थामा मेश्राम
अर्जुनी/मोर.गोंदिया
=======

Previous article
Next article

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles