
अधुरी स्त्री
आयुष्यात येऊनी जगता जगता
जीवनातील अनमोल क्षण वेचते
छान सुखाचे सूर कुटुंबात गुंफते
प्रेमाचे धागे मनापासून ‘वसुधा’ जपते…..
स्त्री या जन्मातील अनमोल देणं
आईबाबांची लाडाची आहे परी
माहेर सोडून सासरी आली खरी
उजळवला दिवा दोनही घरी….
सप्तपदीची सात पावले सजनासंगे
सात वचने दिली विश्वासाने
अधुरी स्त्री पूर्ण झाली आता
भरभरून दिलेल्या पतीच्या सौख्याने….
अंतरीचे धागे जुळवून घेतले
अनमोल बीज उदरी वाढवले
हर्षाने आनंदात मनसोक्त नहाले
अधुरी स्त्री मी माता म्हणून भरून पावले…..
वसुधा नाईक,पुणे
==========