बोला छान! हसा छान!! दिसा छान!; डाॅ.मधुसूदन घाणेकर

बोला छान! हसा छान!! दिसा छान!; डाॅ.मधुसूदन घाणेकर



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

वसुधा नाईक, प्रतिनिधी पुणे

पुणे :17 एप्रिल 2023 : ” छान छान बोला,छान छान हसा आणि छान छान
दिसत खुप मोठे व्हा !” असा संदेश
पहिल्या विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, बालसाहित्यकार आणि आंतरराष्ट्रीय कीर्तिचे कलावंत डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी, एकात्मिक संस्कार वर्गात बालांना दिला. दिव्यांग कल्याणकारी शिक्षण संस्था व वैद्यकीय संशोधन केन्द्र आयोजित संस्कार वर्गात डाॅ.मधुसूदन घाणेकर यांचा खास बालांसाठी ‘ सबकुछ मधुसूदन ‘ ह्या विश्वविक्रमी एकपात्री कार्यक्रमाचा 76401 वा प्रयोग आयोजित केला होता, याप्रसंगी डाॅ.घाणेकर बोलत होते.अध्यक्षस्थानी
दिव्यांग कल्याणकारी शिक्षण संस्थेच्या
प्राचार्या शिवानी सुतार होत्या.

प्रारंभी डाॅ.घाणेकर यांच्या शुभहस्ते काही शिबिरार्थी बालांसमवेत सरस्वती पूजन करण्यात आले. शिबिरार्थी प्रतिनिधी राधिका बेकेने अतिथी स्वागत आणि परिचय करुन दिला. सतिश कालेकर यांनी सूत्रसंचालन आणि संयोजन केले. सिध्देश्वर खडसे याने आभार मानले. हसर्‍या बालांना हाहाहाsssलाफ इंटरनॅशनल ॲवाॅर्ड तर गोड बोलणा-या बालांना मिठू मिठू पोपट ऑकवर्ड डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी दिले.

शिबिरार्थींच्या वतीने डाॅ.मधुसूदन घाणेकर यांचा जाहिर सत्कार करण्यात आला. डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी स्वरचित बाल कविता, शिट्टीवर बालगीते,बालांच्या हस्ताक्षरावरून त्यांचे मिष्किल स्वभावदर्शन तसेच विनोदी किस्से…विनोदी पाढे..बोलके प्राणी,पक्षी, बाहुली तसेच हसण्या रडण्याचे प्रकार आदि बहुरंगी बहुढंगी कार्यक्रमातून बालांना मनमुराद हसवले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles