
छोटी बाहुली
जन्म दिला जिने
धन्य ती माऊली
हात पकडला तिचा
ती छोटी बाहुली……
बाहुली बाहुली म्हणता
मोठी झाली ती आज
सौभाग्यवतीचे लेणे
चढवले तिने सुरेख साज….
तिला पण झाली
दोन लेकर आज
मोठी झाली मुले
त्यांनी दिली साथ आज….
संसार तिचा जणू
दुधावरची आहे साय
आपलीच माणसं बर
कधी दूर जातील त्याचा
काही भरवसा नाय….
अजूनही आठवण येते
बाहुलीला मायेच्या उबेची
अशी आहे कहाणी
छोट्याश्या बहुलीची……
शीतल नाईक, शर्मा. पुणे
=====