
राजमाता जिजाऊंची दूरदृष्टी
शूरवीर जिजाई तुझीच पुण्याई
रयतेची बणले शिवराय सावली
शिवबाला पराक्रमी तू घडवलस
असी तू राजमाता जिजाऊ माऊली।
राजमाता जिजाऊंची दूरदृष्टी
स्वराज्याचा होता मुलमंत्र
तोरण बांधण्या शिवबाला
स्वराज्याचे दिले हाती सुत्र।
राजमाता जिजाऊंची दूरदृष्टी
होती संकटात सामना करण्याची
रणांगणातही नसायची कधीच मागे
मूठ पकडून तलवारीची शत्रूवर तुटायची।
प्रत्येक मावळ्यांच्या रक्तात
अभिमान जिजाबाईने जागवला
आपल्या शिवबालाही ज्ञान देऊन
रयतेचा सच्चा न्यायदाता बणवला।
छाताडावर गुलामीच्या प्रहार
करणारी तुझी राजमाता दूरदृष्टी
गावे किती तुझे आम्ही गोडवे
निर्माण केलीस तूच मराठ्यांची श्नुष्टी।
प्रतिमा नंदेश्वर,चंद्रपूर