
हरवलेला विश्वास
जुळेना परत कधी
हरविलेला विश्वास
म्हणोनी धरावी सदा
नेहमी सत्याची कास
जेव्हा तुटती विश्वास
ओलावती नेत्र कडा
मुखवटे लावल्याने
विश्वासाला जातो तडा
आभासिच्या दुनियेत
सत्य वाटे कडवट
सदा संघर्ष जीवनी
मनी असे घुसमट
आत्मविश्वास असावा
नित्य मनी जीवनात
धैर्याने समोर जाता
यश पडे पदरात
प्रा. दिनकर झाडे, गडचांदूर
जि. चंद्रपूर