
मनकवडा
वाटतं बोलावं तुजपाशी, दोन शब्द अंतरातले
वाचून घेतोस डोळ्यात, बोलण्या आधी मनातले
किती सहज कळते तुला, माझ्या मनाची गूढ भाषा
योग्य अर्थ लावतोस, चेहर्यावरच्या पाहताच रेषा..
हसण्या आड लपविन्या वेदना, मी झुकविते पापणी
तरीही टिपून घेतोस अलगद, माझ्या डोळ्यातले पाणी
संवाद माझ्या मनाचा, कसा डोळ्यात तू वाचतो
शब्दाविना भाव तुला, कसा हृदयाचा कळतो
कांहीतरी लपवण्यासाठी, केला चेहरा जरी भाबडा
आंतरमन माझं जाणणारा, तूच खरा मनकवडा
शब्दां वाचून मन वाचणं, असं कसं जमतं रे तुला
ना जाणो कुठे अवगत केलीस, ही अवघड कला..
जिवाभावाचं नातं मैत्रीचं, कायमचं घट्ट असावं
दुखावले जरी मी कधी, तू सांत्वनाला उभं राहावं.
इंदू मुडे ब्रम्हपुरी, जि.चंद्रपूर