
अश्रूंचा पूर
दृष्टी पडता कुठेही
पाहे माऊलीची माया
वाहे अश्रूंचा पूर हा
दुरावली मातृछाया
आठवण येता आई
तुझी मज क्षणोक्षणी
दाटतात आपसूक
फुले अश्रूंची नयनी
दिशा दिली जगण्याची
बीज पेरले संस्कारे
आईविना झालो आता
खरोखर पोरका रे
सारे काही मिळे जगी
आई अलभ्य प्राप्तीला
लाभे जेव्हा मातृछाया
अर्थ असे जगण्याला
स्मृती जागविते आई
येता तुझी आठवण
लिहिताना ‘ज्ञानाग्रज’
होई भावनाप्रधान
दत्ता काजळे ‘ज्ञानाग्रज’
उमरगा जि.धाराशिव
=========