
अश्रुंचा सागर
उंचबळतो अश्रुंचा सागर
उर दुःखाने दाटून आला,
भावभावनांचा कल्लोळ
पावसासारखा बरसला.
सहवासातील प्रियंजन
जेव्हा,जग सोडून जातात,
संयमाचा बांध फुटून
जगणे दुश्वर करतात.
आठवणी स्मरून
घालमेल होते मनाची,
झाली ताटातूट कशी?
हीं,जीवनभराची.
टाहो फुटून रडती सारे
कीव कशी देवा येईना?
सर्वा समक्ष प्राण उडतो,
कसा कोणाला दिसेना?
महापूर नात्यागोत्यांचा
तरीही मी एकटी भासे
शोधू कोठे मी आता?
सारे जीवन सुने सुने.
शब्द हीं सुचत नाहीत
भावना व्यक्त करायला,
प्रती आवाज येईना
साद घालते तुम्हाला.
मायादेवी गायकवाड
मानवत, परभणी
=======