
‘रमाईने महिलांना स्वाभिमान शिकवला’; ज्येष्ठ रंगकर्मी प्रभाकर दुपारे
नागपूर: रमाईचे कार्य केवळ सेवाभावच नसून त्यांच्या चरित्राने महिलांना स्वाभिमान शिकवला असे मत रमाई या एकपात्री नाटकाच्या कलावंतांनी व्यक्त केले. एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हे कलावंत बोलत होते.
सुप्रसिद्ध नाटककार प्रभाकर दुपारे यांनी लिहिलेल्या या नाटकाचे लेखक, दिग्दर्शक व कलावंतांनी नुकतीच संयुक्त मुलाखत दिली. यावेळी या नाटकाचे दिग्दर्शक शंकर शंखपाळे, रमाईची भूमिका करणाऱ्या प्राची दाणी यांनी रमाई नाटकाचे भावनीक वेगळेपण स्पष्ट केले. हे नाटक राज्यात लोकप्रिय होत आहे. प्राची दाणी यांचा जिवंत अभिनय यामुळे महिलांच्या डोळ्यात क्षणोक्षणी अश्रू तरंगतांना दिसतात.
या नाटकाचे हजाराच्यावर प्रयोग झाले असून आपण प्रथमच रमाईचे जीवन नाट्यबद्ध केले आहे. असे लेखक प्रभाकर दुपारे यांनी व्यक्त केले. तर आपल्यासाठी हे नाटक म्हणजे एक आवाहन होते. असे मत दिग्दर्शक शंकर शंखपाळे यांनी व्यक्त केले. तर या नाटकाच्या कलावंत प्राची दाणी यांनी सांगितले की, या नाटकाचे लेखन इतके जबरदस्त आहे की, आपण पहिल्या वाक्यापासूनच रमाईच्या भूमिकेत समरस होतो. प्रत्येक प्रयोगाला उदंड प्रतिसाद मिळतो असेही दाणी यावेळी म्हणाले. या प्रसंगी संगितकार भूषण दाणी हे सुद्धा उपस्थित होते.