
‘स्काय टेक्नॉलॉजी फर्मच्या कारभाराची चौकशी करा’; विवेक पाटील
जिल्हा प्रतिनिधी, नागपूर
नागपूर : कॉटनमार्केट परिसरातील स्काय टेक्नॉलॉजी फर्ममधील एकूणच कारभाराच्या चौकशीची मागणी महाबोधी चॅनलचे डायरेक्टर विवेक पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली.म
पाटील यांनी सांगितले की, या फर्मचे मालक संकेत सुनील जेजानी हे आहेत. येथे बेरोजगार युवकांना जॉब देण्याचे आमिष दाखवून त्यांना पूर्णतः आपल्या जाळ्यात अडकवले जाते. जॉब देताना त्यांच्याकडून आधार, कार्ड, मार्कशीट, पासपोर्टची मूळ प्रत घेतली जाते. पॅन फर्मचे मालक या युवकांकडून मनमर्जी हवालासारखी कामे करवून घेतात. मोठं मोठ्या बॅगमध्ये नोटा भरून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यास भाग पडतात. नकार दिल्यास धमकी देतात. नियमित पगारही देत नाहीत.
एखाद्याने जॉब सोडण्याची इच्छा व्यक्त केल्यास त्याला लाखाची मागणी करून ब्लॅकमेल करतात. त्याचे मूळ f प्रमाणपत्र देत नाहीत. त्यामुळे त्यांना नाईलाज म्हणून काम करावे लागते.
पत्रपरिषदेत खुद्द पीडित युवकांनी उपस्थित राहून आपबिती सांगितली. पत्रपरिषदेत अनुप मेश्राम, अंकित भगत आदी उपस्थित होते.