‘पत्त्यांची गंम्मत…!; पत्ते म्हणजे जुगार नव्हे.

‘पत्त्यांची गंम्मत…!; पत्ते म्हणजे जुगार नव्हे.पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

पत्त्यांचा खेळ म्हटला की तो जुगाराचा खेळ वाटतो,आणि खेळणारा जुगारी वाटतो,ह्या पलीकडे आपल्या कडे माहीती नाहीपत्त्यांविषयी जाणून घेऊ.

पत्ते हे सामान्यतः आयताकृती पातळ पुटठ्याचे किंवा प्लॅस्टिक चे बनविलेले असतात.
*बदाम,इस्पिक,किलवर (किल्वर) आणि चौकट.* या चार प्रकारात प्रत्येकी १३ पत्ते मिळून ५२ पत्त्याचा संच होतो.
पत्त्याची विभागणी एक्का,दुर्री, तिर्री,या क्रमाने दस्सी पर्यन्त, गुलाम,राणी,राजा याशिवाय २ जोकर असतात.

१) ५२ पत्ते म्हणजे ५२ आठवडे
२) ४ प्रकारचे पत्ते म्हणजे ४ ऋतु.
प्रत्येक ऋतू चे १३ आठवडे.
३) *या सर्व पत्त्याची बेरीज ३६४*
४) *एक जोकर धरला तर ३६५ म्हणजे १ वर्ष.*
५) *२ जोकर धरले तर ३६६ म्हणजे लीप वर्ष.*
६) ५२ पत्यातील १२ चित्र पत्ते
म्हणजे १२ महिने
७) *लाल आणि काळा रंग म्हणजे दिवस आणि रात्र.*

पत्त्यांचा अर्थ समजून घेऊ…

१) दुर्री म्हणजे पृथ्वी आणि आकाश
२) तिर्री म्हणजे ब्रम्हा,विष्णू आणि महेश
३) *चौकी म्हणजे चार वेद(अथर्ववेद,सामवेद,ऋग्वेद, यजुर्वेवेद)*
४) पंजी म्हणजे पंच प्राण
(प्राण,अपान,व्यान, उदान,समान)
५) छक्की म्हणजे षड रिपू
(काम,क्रोध,मद,मोह, मत्सर,
लोभ)
६) सत्ती- सात सागर
७) अठ्ठी- आठ सिद्धी
८) नववी- नऊ ग्रह
९) दस्सी- दहा इंद्रिये
१०) गुलाम- मनातील वासना
११) राणी- माया
१२) राजा-सर्वांचा शासक
१३) एक्का- मनुष्याचा विवेक
१४) समोरचा भिडू – प्रारब्ध

मित्रांनो…
लहानपणा पासून पत्ते बघीतले असतील,काहींनी खेळले असतील परंतू त्या पत्त्यांच्या संचा बद्दल माहीती होती का ?
त्याचे उत्तर बहुदा नाहीच असेल. आहे ना गंमतीशीर आणि ज्ञानदायी.
*पत्त्याचा डाव खेळताना आयुष्याच्या डावाचा अर्थ समजून घेतला तर जगणे नक्कीच सोपे होऊ शकते.*

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles