महाराष्ट्रदिनी दुबईत निनादला ढोल ताशाचा आवाज

महाराष्ट्रदिनी दुबईत निनादला ढोल ताशाचा आवाज



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_त्रिविक्रम ढोल ताशा पथकातर्फे महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्या_

वृत्तसंस्था, विशेष प्रतिनिधी

दुबई: महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्र दिन साजरा करण्यासाठी त्रिविक्रम ढोल ताशा पथक दुबई या पथकाचे संस्थापक सागर पाटील यांनी चक्क एक लक्झरी योटवर, पर्शियन गल्फ या समुद्रात, जगातील एकमेव 7 स्टार हॉटेल ‘बुर्ज अल अरब’ याच्यासमोर, पाण्यात ढोल ताशाचे वादन करत नवीन विक्रम केला आहे. महाराष्ट्र दिनी दुबईमध्ये महाराष्ट्राचा ढोल वाजवणाऱ्या या पथकाचे जगभरातील महाराष्ट्र प्रेमी नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.

त्रिविक्रम ढोल ताशा पथक दुबई, हे आखाती देशातील पहिले व एकमेव पारंपारिक ढोल ताशा पथक आहे. दरवर्षी साधारण 25 ते 30 वादन करणार हे पथक, आपल्या सादरीकरणातून नेहमीच महाराष्ट्राची कला व संस्कृतीचे उत्तम प्रदर्शन आंतरराष्ट्रीय पातळीवर जगासमोर मांडत आले आहे.

महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्र दिन साजरा करण्यासाठी पथकाचे संस्थापक सागर पाटील यांनी चक्क एक लक्झरी योटवर, पर्शियन गल्फ या समुद्रात, जगातील एकमेव 7 स्टार हॉटेल ‘बुर्ज अल अरब’ याच्यासमोर, पाण्यात ढोल ताशाचे वादन केले.

ही धाडसी कल्पना आखताना सागर पाटील म्हणतात, महाराष्ट्राची कला व संस्कृती परदेशात राहुन जपण्याचे व त्याचा प्रचार करण्याचे काम गेली पाच वर्ष करत आहेत. यावर्षी काहीतरी वेगळे करण्याच्या हेतूने ही संकल्पना आखली. या वादनासाठी पथकातील 20 वादकांनी सहभाग घेतला व यात महिलांचाही समावेश होता.

ही बोट दुबई (Dubai) मरीना येथून वादकांना घेऊन निघाली आणि वाटेत Dubai Eye Giant Wheel समोरून वादन करीत बुर्ज अल अरब या हॉटेलच्या समोर पाण्यात थांबली व या ठिकाणी ढोल ताशाचे वादन करून या पथकाने परतीचा प्रवास गाठला. असा हा विक्रम करून दुबईच नव्हे तर जगभरातील सर्व महाराष्ट्रीय जनतेला त्रिविक्रम ढोल ताशा पथकाने महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्या दिल्या.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,876FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles