गंध प्रितीचा

गंध प्रितीचा



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

गंध गुलाबाचा असा
सांगूनीया गेला मनी
आठवण येई मज
तुझी माझ्याच साजनी||१||

गंध तुझ्याच प्रेमाचा
साद हृदयी घालतो
माझ्या हळव्या मनाला
आवर्जून बोलावतो||२||

गंध प्रितीच्या फुलाचा
जणू पावसाच्या सरी
नाते आपले प्रेमाचे
प्रेम बरसात करी||३||

गंध प्रितीचा सुंदर
माझ्या हृदयी फुलला
क्षण मोहक प्रेमाचा
मनी माझ्या बहरला||४||

तुझ्या प्रेमाचा हा गंध
आठवणींचाच साज
तुझी आठवण येता
मन बोलावते आज||५||

विनायक कृष्णराव पाटील
बेळगाव, कर्नाटक
=========

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles