
कातरवेळी तुटला धागा
तुटलेले धागे जोडत बसले,
होते कातरवेळी
अचानक मनाला कुणाची तरी,
आठवण झाली
उसासा सोडला मनाने अन,
लाट ही सागराची शांत झाली
तळमळ मनाची त्यानेही,
मुक्यानेच सहन केली
वाट पहात बसले वाळूवर,
हाताने रेघोट्या मारत होते
खाऱ्या पाण्याच्या समुद्रात,
मीही माझे अश्रू गाळत होते
दूर दूर पसरलेल्या सागराला,
कळले होते दुःख माझेही
उसळून त्याने मला थोडेसे,
गोंजारले होते
येशील तु ह्या भ्रमात आठवणींचा
पसारा मांडून एकटीच बसले
कसा कोणास ठाऊक पुन्हा,
मन तुटलेल्या धाग्यातच गुंतले
तुटलेल्या त्या धाग्याला,
जोडण्याचा खोटा प्रयत्न केला,
आला नाही तु अन पदर तुझ्या,
आठवणीत ओला झाला.
सविता वामन, जि.ठाणे.
=======