संस्कार

संस्कार



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

आपले मन असते भरकटलेले जहाज
संस्कारानेच त्यावर चढून चला ताज…धृ..

मायबाप अपुले हो पहिलेच गुरू
बोटधरून चालायला लावले तूरूतूरू
संस्काराचा पाजला पहिलाच डोज….||१||

प्राथमिक शिक्षण असतो अपुला पाया
अक्षर ओळख करून देतो गुरूराया
बालगीतेतून संस्काराचे बोध पाजतो रोज….||२||

गुरूच्या सानिध्यात होते ज्ञानाची पारख
ज्ञान विज्ञानाची येथे होते थोडी ओळख
मुल्यशिक्षणाचा पाजतो अमृत डोज….||३||

गुरू ,महागुरूच्या विचारांचे ते बोल
ध्यानात सदा ठेवून सांभाळावे तोल
निरीक्षण परिक्षणातून लावूया खोज….|| ४||

सुधा अश्वस्थामा मेश्राम
अर्जुनी/मोर.गोंदिया

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,876FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles