
चूकभूल द्यावी घ्यावी
एका हाताने वाजत नाही टाळी
माझेही चूकतेच कधी-काळी
कळत-नकळत होतातच चूका
नको ना गडे, हा रूसवा मूका
रागाचा डोंगर नको ना चढू
वायफळ कारणास नको ना लढू
मी कुठे म्हटले? तूच आहेस खुळी
मी ही आहे ना तुझाच सवंगडी
चूकभूल द्यावी घ्यावी आता
करना माझ्यासी थोड्याशा बाता
संसार दोघांचा करू या ना जोडीने
राहू या ना दोघेही गोडीगुलाबीने
वनिता गभने, आसगाव जि.भंडारा
=======