महाराष्ट्रातच मराठी चित्रपटावर अन्याय; मराठीची गळेचेपी सुरूच

महाराष्ट्रातच मराठी चित्रपटावर अन्याय; मराठीची गळेचेपी सुरूचपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_टी डी एम च्या दिग्दर्शकाचे अश्रू अनावर; प्रेक्षकांना चित्रपट बघू देत नसल्याची खंत_

बॉलीवूड विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबई: काल संपूर्ण राज्यात १ मे महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला. तर इकडे चित्रपट सृष्टीत कोलाहल माजल्याचे चित्र सर्वदूर पसरले असल्याचे समजते. मराठी चित्रपटांना शो न मिळण्याचा सिलसिला अनेक वर्षे सुरू होता, त्यावर अनेकदा वादविवादही झाले आहेत. मध्यंतरी हे प्रकार शमले होते परंतु हा प्रकार आता पुन्हा समोर येतो आहे. पुन्हा एकदा अशाच एका वादाला फोडणी मिळाली आहे. मराठी चित्रपटसृष्टीत असे अनेक चित्रपट होऊन गेले ज्यांना प्राईम टाईमचा शो मिळणं कठीण झालं होतं. त्यामुळे आता हा प्रश्न पुन्हा उपस्थित झाल्यानं सगळीकडे चर्चांना उधाण आलं आहे.

TDM हा मराठी चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे तेव्हा या चित्रपटाला शो मिळत नसल्यानं थिएटरमध्ये दिग्दर्शक आणि कलाकारांनी अक्षरक्ष: प्रेक्षकांशी हात जोडून संवाद साधला. यावेळी त्यांना अश्रूही अनावर झाले होते. ‘टीडीएम’ हा मराठी चित्रपट 28 एप्रिल रोजी संपुर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला सुरूवातीला ओपनिंग चांगलं मिळालं आहे परंतु बऱ्याच ठिकाणी या चित्रपटाचे शो हे कॅन्सल केले जात आहेत त्यामुळे चित्रपटाचे दिग्दर्शक आणि कलाकार हे चिंतेत आहेत. या चित्रपटाला प्राईम टाईमही मिळत नसल्याचे दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे आणि चित्रपटातील कलाकरांचे म्हणणे आहे. या चित्रपटाचा शो एका शिएटरमध्ये लागला होता तेव्हा चित्रपट संपल्यानंतर चित्रपटातील संपुर्ण टीमनं ही माहिती दिली. याबद्दल बोलताना भाऊराव कऱ्हाडे, अभिनेत्री कालिंदी आणि अभिनेता पृथ्वीराज थोरात यांनी अश्रू अनावर झाले होते.

*नक्की काय म्हणाले भाऊसाहेब कऱ्हाडे?*

यावेळी प्रेक्षकांशी संवाद साधताना ते म्हणाले की, ”मला शोसाठी वेळ द्या, आमचा सिनेमा चालला नाही तर तो घेऊ नका पण किमान आमचा चित्रपट हा प्रेक्षकांना दाखवा. प्रेक्षकांना ठरवू द्या तो कसा आहे ते. या चित्रपटाचेच उदाहरण घ्या, एवढे लोक आमचा सिनेमा बघायला इथे आले आहेत म्हणून आम्ही त्यांना (वितरकांना) (Distributors) विनंती केली आहे की आम्हाला आणखीन एक शो द्या परंतु त्यांनी तो दिलेला नाही. हा असा भेदभाव आमच्यासोबत केला जात असल्यानं आता माझी चित्रपट बनवण्याची इच्छा राहिलेली नाही. लोकांना आमचा चित्रपट बघायचा असूनही तो त्यांना बघू दिला जात नाही आहे.

आम्ही वितरकांना विचारतोय तर ते म्हणाले की आम्हाला ‘वरून’ आदेश आले आहेत की आमच्या चित्रपटाचा एकही शो लावायचा नाही. आमचा चित्रपट पाहिलेल्या एकानंही या चित्रपटावर टीका केली नाही त्यामुळे हा असा भेदभाव आमच्यासोबत करणं चुकीचं आहे”, असं चित्रपटाचे दिग्दर्शक भाऊसाहेब कऱ्हाडे म्हणाले.

*’ख्वाडा’च्या दिग्दर्शकांवर ही वेळ का आली?*

स्वत:चं शेतपोत विकून फिल्म इंडस्ट्रीत नाव कमावलेल्या ‘ख्वाडा’ फेम दिग्दर्शक भाऊ कऱ्हाडेचा नवा सिनेमा ‘टिडीएम’ला शोज मिळू दिले जात नाही आहेत. फिल्म इंडस्ट्रीतल्या या कंपूशाहीला कंटाळून त्यांनी आता सरळ सिनेमाच थांबवण्याची उद्विग्नता बोलून दाखवली आहे. ‘टिडीएम’ या सिनेमाला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळत असतानाही माझ्या सिनेमाचे शोज नेमकं कोणाच्या दबावाखाली पाडले जाताहेत? असा परखड सवाल भाऊ कऱ्हाडेनं उपस्थित केला आहे . ‘टीडीएम’ चित्रपटाला शो न मिळाल्याने दिग्दर्शक भाऊसाहेब कऱ्हाडे संतापले आहेत.

*अजित पवार यांनीही घेतली दखल*

लोकांना ठरवू दे चित्रपट चांगला आहे की नाही. यावेळी या चित्रपटातला अभिनेता पृथ्वीराज थोरात म्हणाला की, ”प्रेक्षक तुम्हीच हा चित्रपट मोठी करू शकता, आम्ही तुम्हाला सर्वांना विनंती करतो की तूम्ही हा चित्रपट पाहावा. आमच्या कष्टाचं चीज व्हावं. यासाठी तुम्ही आम्हाला मदत करा. लोकांना ठरवू द्या कोणता चित्रपट चांगला आहे ते”, असं तो यावेळी म्हणाला. याबद्दल अनेक चाहते सोशल मीडियावर याबद्दल पोस्ट करताना दिसत आहेत व आपला निषेध व्यक्त करताना दिसत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles