महाविकास आघाडीची ‘घडी विस्कटणार’; पवारांचा निर्णय लावणार सुरुंग

महाविकास आघाडीची ‘घडी विस्कटणार’; पवारांचा निर्णय लावणार सुरुंग



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्षपद अचानक सोडल्यानं राज्यात राजकीय गोंधळ सुरु झाला आहे. यामध्ये पवारांच्या निर्णय महाविकास आघाडीला सुरुंग लावणारा ठरतोय असे जनसामान्यांचे मत आहे. कारण मविआ नेस्तनाबूत होणार असल्याची चर्चा राजकीय नेत्यामंध्ये सुरू असून याबाबत नेमके काय घडेल याची शाश्वती नाही.

अध्यक्ष शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं अध्यक्षपद सोडण्याच्या निर्णयामुळं महाविकास आघाडीवर नक्कीच परिणाम होईल, असं ६०.७ टक्के लोकांना वाटतं आहे. म्हणजेच सॅम्पलमधील सर्वाधिक लोकांना पवारांच्या निर्णयाचे राज्याच्या राजकारणावर मोठे परिणाम होतील असं वाटतं आहे.

दरम्यान, पवारांच्या या निर्णयामुळं मविआवर परिणाम होईल की नाही, याबाबत २८.४ टक्के लोक संदिग्ध आहेत, त्यामुळं याबाबत काही सांगता येणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तर केवळ १०.९ टक्के लोकांना पवारांच्या राष्ट्रवादी सोडण्याच्या निर्णयामुळं मविआवर काहीही परिणाम होणार नाही, असं वाटतं आहे.

पण पवारांनी राष्ट्रवादीचं पद सोडणं आणि त्यामुळं मविआवर परिणाम होण्याबाबत संदिग्ध असलेल्यांची संख्या जवळपास ३० टक्के असल्यानं बऱ्याच जणांना शरद पवारांची ही नक्की खेळी काय आहे? हे कळेनासं झालं आहे किंवा शरद पवारांच्या बेरकीपणावर त्यांचा ठाम विश्वास असल्याचं दिसून येत आहे. म्हणूनचं त्यांनी स्पष्टपणे काहीही सांगण्यास नकार दिला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles