‘अभ्यास आणि मनोरंजनाचा संगम’; वनाझ विद्या मंदिरचा आगळा उपक्रम

‘अभ्यास आणि मनोरंजनाचा संगम’; वनाझ विद्या मंदिरचा आगळा उपक्रम



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_विद्यार्थ्यांचे सरत्या शालेय वर्षात अखेरचे दिवस संस्मरणीय_

अमृता खाकुर्डीकर, प्रतिनिधी पुणे

पुणे: यंदाच्या शैक्षणिक वर्षाचा समारोप करताना ‘वनाझ’ परिवार विद्या मंदिर, कोथरूड या शाळेने शेवटचा आठवडा अभ्यास आणि मनोरंजनाचा संगम असणा-या विविध कार्यक्रमाचे आयोजन करून आगळ्या वेगळ्या उपक्रमासह वैविध्यपूर्ण रीतीने साजरा केला.

विद्यार्थ्यांचे सरत्या शालेय वर्षात अखेरचे दिवस संस्मरणीय करण्यासाठी आणि सूट्टीतील अभ्यासाचे नियोजन करण्यासाठी खास आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी वर्षभर केलेला अभ्यास आणि त्यासोबतच कला क्रीडा विषयक कार्यक्रमात नोंदवलेला सहभाग यांचा एक प्रकारे हा समारोपच ठरला. उपक्रमाची सुरूवात करताना माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका वृषाली वाशिमकर यांनी निमंत्रित मान्यवरांचे स्वागत केले.

पहिल्या दिवशी जनकल्याण समितीच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी ज्ञान व मनोरंजनाचे पहिले सत्र घेण्यात आले. खेळातून शिक्षणाबरोबरच विविध जीवन कौशल्ये मुलांना आत्मसात करता यावीत, अशा प्रकारचे क्रीडा प्रकार मुलांकडून करून घेण्यात आले. संघटीतपणा, मनोधैर्य, एकाग्रता, नेतृत्व व निरीक्षण शक्ती या गुणांचे दर्शन घडवणारे कार्यक्रम गटचर्चा, प्रात्यक्षिके यात सादर करण्यात आले. जनकल्याण समितीच्या अश्विनी सरपोद्दार यांनी नाविन्यपूर्ण खेळांच्या माध्यमातून मुलांमध्ये एक प्रकारचे नवचैतन्य निर्माण केले. श्रीमती मुळे व आंधळे यांनी सत्र संचालन करण्यात सहभाग घेतला.

दुस-या दिवशी पुढील सत्रात ‘संस्कार आयाम ‘ या शीर्षकांतर्गत कथाकथन कार्यक्रम घेण्यात आला. श्री सबनीस सर यांनी बोधपर रंजक कथा सांगून विद्यार्थ्यांचे मनोरंजन करतानाच नकळत संस्कार रूजवणारे आणि संदेशपर कथाकथन करून विद्यार्थ्यांना मूल्यशिक्षण दिले.

तिस-या दिवशीचे सत्र खूपच बोधप्रद ठरले. आजच्या काळातील मुले ही मनाविरुद्ध थोडे काही घडले की लगेच नैराश्यामध्ये जातात. या अनुषंगाने सदरच्या सत्रात विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवणे, सकारात्मक विचार करणे, संकटावर मात करण्याचा प्रयत्न करणे, या बाबतचे काही मानसिक उपचार सांगण्यात आले. ध्येयप्राप्ती
साठी आधी तशी कृती आवश्यक असून त्यासाठी दूरदृष्टीने योग्य नियोजन करण्याची गरज आहे. भावी आयुष्यात उपयोगी पडतील अशा गोष्टी उलगडून सांगणारे हे समुपदेशन विद्यार्थ्यांना खूप मदत करणारे ठरले. यानंतर विज्ञान वाहिनीची ‘फिरती प्रयोगशाळा’ यांच्या वतीने विविध वैज्ञानिक प्रयोग घेण्यात आले.

रसायनशास्त्र , भौतिकशास्त्रातील तत्त्वांवर आधारीत अनेक प्रात्यक्षिके करून दाखवण्यात आली. तर; जीवशास्त्राच्या काही गोष्टी पाॅवर पाॅईंट प्रेझेंटेशन द्वारे सचित्र दाखवण्यात आल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष समोर घडणा-या कृतीतून आणि विविध उदाहरणांसह अतिशय सोप्या पद्धतीत विज्ञानाच्या रंजक गोष्टी समजल्या. शास्त्र विषयाची आवड निर्माण होईल, असे हे प्रयोग मुलांना खूपच आवडले. या वैज्ञानिक
सत्रासाठी परचुरे मॅडम आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन करणारा आणि तितकाच मजेशीर ठरला. एकूणच या उपक्रमशील आठवड्यामुळे शाळेच्या वतीने आयोजित विविध कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना सुट्टीत सुध्दा ज्ञान आणि मनोरंजन यांची सांगड घालून अभ्यासाचे उद्दिष्ट कसे साध्य करता येईल याचे सोदाहरण प्रात्यक्षिकच एक प्रकारे देण्यात आले.

मुलांमध्ये अभ्यासाची ईच्छा आणि विज्ञानाचे कुतूहल जागृत करण्याचे ध्येय साध्य करणा-या.या उपक्रमाचे संयोजन व सूत्रसंचालन वृंदा घन आणि कावेरी गाडेकर या आध्यापकांनी केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,876FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles