
अ.भा.मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक ‘या’ तारखेला होणार
मुंबई: अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेची निवडणुक गेल्या काही दिवसांपूर्वी पार पडली आहे. या निवडणुकीनंतर नाट्यपरिक्षदेचा अध्यक्ष कोण होणार याची नाट्यवर्तुळात चांगलीच चर्चा रंगली. आता अध्यक्षपदाची निवडणुक येत्या काही दिवसांत पार पडणार आहे.
ननाट्यपरिषदेच्या कार्यकारी समितीची निवडणूक कधी पार पडणार याकडे नाट्यप्रेमींचं लक्ष लागलं होतं. येत्या 16 मे ला ही निवडणूक होणार आहे. अभिनेते प्रशांत दामले (Prashant Damle) आणि नाट्यनिर्माते प्रसाद कांबळी (Prasad Kambli) यांच्यात नाट्यपरिषदेच्या अध्यपदासाठी चढत होणार असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता कोणाचं नाणं खणखणीत वाजणार याकडे नाट्यसृष्टीचं लक्ष लागलं आहे.
नाट्यपरिक्षदेचा अध्यक्ष आणि कार्यवाही यांच्यासह प्रशासन आणि उपक्रमासाठी दोन उपाध्यक्ष या निवडणुकीत निवडले जातील. त्यांसह तीन सहकार्यवाह, एक कोषाध्यक्ष आणि 11 सभासददेखील निवडले जाणार आहेत. एकूण 19 जागांसाठी मतदान केले जाणार आहे.
*अध्यक्षपदासाठी प्रशांत दामले आणि प्रसाद कांबळी यांच्यात लढत*
अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या कार्यकारी समितीच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. यात अविनाश नारकर, अजित भुरे, वीणा लोकूर, भाऊसाहेब भोईर, शैलेश गोजमगुंडे, सतीश लोटके, समीर इंदुलकर, सुकन्या कुलकर्णी, ऐश्वर्या नारकर, सविता मालपेकर, सुशांत शेलार यांच्यासह अनेक उमेदवारांचा समावेश आहे. पण या सगळ्यांमध्ये अध्यक्षपदासाठी प्रशांत दामले आणि प्रसाद कांबळी यांच्यात चांगलीच लढत होणार आहे.
नाट्यपरिषदेच्या अध्यक्षपदासाठी प्रशांत दामले, अजित भुरे आणि प्रसाद कांबळी या नावांची चर्चा आहे. तसेच अभिनेता सुशांत शेलारने देखील अध्यपदी विराजमान व्हायची इच्छा व्यक्त केली आहे. नाट्य परिषदेच्या निवडणुकांनंतर प्रशांत दामले यांच्या ‘रंगकर्मी नाटक समूह पॅनल’मधील उमेदवारांमध्ये धुसपूस सुरू झाल्याची माहिती समोर आली होती.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीचा निकाल गेल्या काही दिवसांपूर्वी जाहीर झाला. यात रंगकर्मी नाटक समूहाच्या पॅनलल मुंबईतील 10 पैकी 8 जागा, तर प्रसाद कांबळींच्या ‘आपलं पॅनल’ला फक्त 2 जागा मिळाल्या होत्या. आता नाट्यपरिषदेच्या अध्यक्षपदी कोण विराजमान होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.