
मुसळगांवात भगवान गौतम बुद्ध जयंती उत्साहात
नागपूर: ऑरेंज सिटी बहुउद्देशीय संस्था विहीरगाव नागपूर व मानसी सांस्कृतिक कला मंडळ मुसळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सुगत बुद्ध विहार मुसळगाव येथे घेण्यात आली.
बहुजन हिताय बहुजन सुखाय या विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांची २५६७ जयंती साजरी करण्यात आली. मुसळगाव कुही तालुक्यातील जिल्हा नागपूर येथे बुद्ध जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रा.मुसळगाव सरपंच डॉ.चिंतामणज भुजाडे, बंडूजी बेंबारे, वंदना मेश्राम, रंजना झाडे, राकेश चिमणकर, शाहीर दिलीप मेश्राम, अशोक मेश्राम, राजू मेश्राम, अशा अनेक बुद्ध बांधवांच्या समक्ष मौजा मुसळगावात बुद्ध जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमांतर्गत बाल नृत्य बुद्ध गीत व्याख्यान प्रबोधन असे अनेक कार्यक्रम साजरीकरण करण्यात आले तसेच अनेक नामवंत कलाकारांनी सहभाग घेतला. बुद्ध धम्म गीताची धमाल केली. कार्यक्रमाचा आस्वाद घेण्याकरिता अजय खडसे, साहिल शेंडे, मानसी शेंडे, रोशन बावणे, रजनी बावणे, करिष्मा काकडे, रेखा मेश्राम, यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभार शाहीर कालीचरण शेंडे यांनी मानले तसेच सर्व बुद्ध अनुयायी यांचे आभार व्यक्त करण्यात आले.