
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय कर्मचारी सहकारी पतसंस्था ‘लोकसत्ता’ संघर्ष पुरस्काराने सन्मानित
अहमदनगर: भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या. परभणी ला राज्यस्तरीय “लोक सत्ता संघर्ष” सर्वोत्कृष्ट पतसंस्था नुकताच नगर येथे आयोजित समारंभात पुरस्कार प्रदान करण्यात आला. आर्थिक साक्षरतेसोबत समाजिक बदल घडवणाऱ्या आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थाना राज्यस्तरीय लोकसत्ता संघर्ष पुरस्कार प्रदान करण्यात येत असतो.
अहमदनगर येथे माऊली सभागृहात पार पडलेल्या दिमाखादार सोहळ्यात परभणी येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय कर्मचारी सहकारी पतसंस्थेला राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट पतसंस्था पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राज्यभरातील विविध क्षेत्रातील प्रशासकीय सेवा, अर्थकरण , समाजकारण,शैक्षणिक,राजकारण, आरोग्य, कला, क्रीडा, नाट्य, इत्यादी क्षेत्रामध्ये समाजिक बदल घडवून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्वाना हा पुरस्कार देण्यात आला.
समाजिक संघर्षात अनेकांनी आपले आयुष्य खर्ची घातले,त्यांच्या याच कार्याला पाठबळ म्हणून व आपले समाजिक कर्तव्य मानून मागील दहा वर्षांपासून लोक सत्ता संघर्ष अशा व्यक्तीचा सन्मान करत आहे. प्रकाश साळवे यांच्या संकल्पनेतून दिनांक 5 मे 2023 रोजी माऊली सभागृह अहमदनगर येथे हा दिमाखदार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला सहकार आयुक्त डॉ. प्रवीण लोखंडे, कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त निशांत सूर्यवंशी पोलीस निरीक्षक मा.खरे साहेब व इतर क्षेत्रातील मान्यवर हे प्रमुख उपस्थित होते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय सहकारी कर्माचारी पतसंस्था ही समाजिक दायित्व जपून समाजात आर्थिक विकासासोबत समाजिक बदल घडवणारी पतसंस्था आहे. प्रशस्त कार्यालय, नियमित मासिक ठेव व पतसंस्थेच्या संचलक मंडळाने मागील् सात महिन्यात 100% कर्जवसुली केली. वेगवेगळे समाजिक उपक्रम राबवून पतसंस्थेचे चेअरमन सतीश कांबळे व सर्व संचालक मंडळ हे सामाजिक बदल घडवण्याचं कार्य करत आहेत. म्हणूनच या पतसंस्थेचा सन्मान होत आहे असे मान्यवरानी म्हंटले. व पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या. हा पुरस्कार स्वीकारण्या साठी चेअरमन सतीश कांबळे,सेक्रेटरी दीपक पंडित, संचालिका मायादेवी गायकवाड,सविता रोडे, वैजयंता कांबळे, संचालक ताजने दादा उपस्थित होते.