‘…..तोवर तुम्हाला खरा ‘बुद्ध’ समजणार नाही’.

‘…..तोवर तुम्हाला खरा ‘बुद्ध’ समजणार नाही’.पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

आमच्या घरी देव्हाऱ्यात पंचवीस तीस विविध देवी देवतांच्या मुर्त्या होत्या. अन आमच्या घराशेजारी राहात असलेल्या बौद्ध घरी बुध्दाची मूर्ती होती. आई सांगायची, तो “त्यांचा” देव आहे, आपला नाही.

आपण हिंदू आहोत आणि आपले शेजारी बौद्ध आहेत ह्याची जाणीव लहानपणी आपोआप होत गेली. माझ्या घरचं वातावरण धार्मिक नव्हतं. कट्टरता तर मुळीच नव्हती. परंतु आपले देव वेगळे, त्यांचा देव वेगळा अशी पुसटशी सीमारेषा जाणवायची.

बुद्ध “आपला” देव नसल्याने त्याच्यात इंटरेस्ट घेण्याचं कारण नव्हतं.

नंतर आयुर्वेद शिकताना आम्हाला दर्शनशास्त्राचा अभ्यास करावा लागला. आस्तिक दर्शन आणि नास्तिक दर्शन अशी दोन शास्त्रे आपल्या भरतीय संस्कृतीत सन्मानाने अभयासली जातात हे माहित झालं. आम्हाला कोणताही एक टॉपिक निवडून त्यावर compilation बनवावं लागायचं. मी बौद्ध दर्शन निवडलं होतं. परंतु तो काळ इंटरनेट च्या सुरवातीचा असल्याने आणि आमच्यापाशी इंटरनेट उपलब्ध नसल्याने बौद्ध दर्शनाबद्दल रिसर्च कुठून आणि कसा करायचा ह्या पेचात पडलो. कॉलेज च्या ग्रंथालयात बौद्ध दर्शनावर काहीच साहित्य उपलब्ध नव्हतं. मग मी अकोल्यात एक दोन बौद्ध विहारात जाऊन तिथून थोडीफार माहिती मिळवली. बौद्ध विचारांचा अभ्यास केलेले एक काका योगायोगाने भेटले, त्यांनी मला थोडी मदत केली. असं करुन मी कसंतरी compilation तयार केलं. आमचे प्राध्यापक हे बुद्धिस्ट होते. मी केलेला रिसर्च त्यांना खुप आवडला. माझं आडनाव आणि मी निवडलेला विषय बघून त्यांना मी बुद्धिस्ट असल्याचा समज झाला. त्यांनी शाबासकी दिली. मला त्यांना झालेला समज दूर करावंस वाटलं नाही.

नंतर पुढं जेव्हा अध्यात्मात शिरलो, तेव्हा बुद्ध म्हणजे विष्णुचा अवतार, बुद्ध म्हणजे “enlightened soul” अश्या प्रचाराला बळी पडलो. ईश्वरवाद्यांनी बुद्धांचं केलेलं दैवतीकरण लक्षात आलंच नाही. त्यात भर पडली माझ्या अध्यात्मिक गुरूंचे बुध्द्धांवरील प्रवचन ऐकून. माझे गुरु (सरश्री ) ईश्वरवादी होते आणि ते बुद्धांची ईश्वरप्राप्ती झालेला एक महान संत अशी प्रतिमा मांडायचे.

ओशो कडून थोडी स्पष्टता आली की बुद्ध हे विवेकवादी होते. पण ओशोचीही भूमिका तळ्यात मळ्यात असल्याने बुद्ध नेमका ईश्वरवादी होता की निरीश्वरवादी ह्यात गोंधळ व्हायचा.

मग जेव्हा अश्या अभ्यासकांच्या संपर्कात आलो ज्यांनी बुध्दाच्या मूलभूत तत्वज्ञानाचा सखोल आणि पुराव्यासहित अभ्यास केला आहे तेव्हा मात्र कळायला लागलं की बुद्धच नाहीतर बुध्दाच्या काळातला बहुतांश मानववर्ग हा विवेकवादी निरीश्वरवादीच होता. आपले बुद्धकालीन पुर्वज हे बुद्धिस्टच असण्याची शक्यता अधिक आहे ह्याची जाणीव झाली. मी ज्या जातीत जन्मलो ती जात म्हणजे पाथरवट (शिल्पकार). शिल्पकला ही बुध्दाच्या काळातच विकसित झाली होती अन बुद्धलेण्या घडवणारे शिल्पकार हे बुद्धिस्टच असायचे. हे माहित झाल्यावर तर भ्रम तुटत गेलेत. ऐतिहासिक, सांस्कृतीक आणि पुरातात्विक पुरावे हेच सिद्ध करतात की चातुर्वर्ण व्यवस्था स्थापित व्हायच्या आधी भारतात बुद्ध धम्म शिखरावर पोचला होता.
बुद्धांना विष्णुचा अवतार बनवून त्यांचं दैवतीकरण करण्यामागे किती मोठं षडयंत्र आहे, ते कुणी आणि कशासाठी रचलं आहे ह्याच्या खोलात जाऊन अभ्यास करणं म्हणजेच बुद्धांना वाहिलेली खरी आदरांजली होय.
जोवर तुम्ही स्वतः मेहनत घेऊन तथ्य शोधून काढणार नाही तोवर तुम्हाला खरा बुद्ध कळणार नाही.

डॉ. विजय रणदिवे

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,877FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles