पंढरपुरातून आलेत विठ्ठल रुक्मिणी नागपुरात

पंढरपुरातून आलेत विठ्ठल रुक्मिणी नागपुरात



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_इंगोले परिवारांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा_

नागपूर: जगदीशनगर येथील श्री नवदुर्गा जागृत मंदिर सेवा ट्रस्टच्या श्री नवदुर्गा मंदिरात श्री विठ्ठल रुक्माई मूर्तीची स्थापना बुधवार दि. ३ मे २०२३ रोजी करण्यात आली आहे. पंढरपुरातून आणलेल्या या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा इंगोले परिवाराच्या हस्ते करण्यात आली. यानंतर, भजन आणि महाप्रसाद वितरणाचा कार्यक्रम पार पडला.

मोहिनी एकादशी पासून तर त्रयोदशीपर्यंत विविध कार्यक्रम मंदिरात घेण्यात आले होते. यात शोभायात्रा, पूजा, पाठ, हवन, अभिषेक, आरती, व महाप्रसादाचे वितरण झाले. शोभायात्रा काटोल रोड येथील वेलकम सोसायटी पासून सुरू झाली. तर आदर्शनगर, साई मंदिर विघ्नहर्ता कॉलनी पासून पून्हा जगदीशनगर येऊन संपली. मंदिराची सजावट मूर्तिकार श्रीराम नागोत्रा यांनी आकर्षकरित्या केली. याप्रसंगी, मंदिराचे अध्यक्ष अनंत कपाळे, कुशल इंगोले व संपूर्ण कमिटीतर्फे आयोजित या प्रसंगात सुमारे ३०० भक्तगण लोकांनी सहभाग नोंदविला होता.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,876FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles