
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध ८५ साठी साहित्य पाठवून उपकृत करावे*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*सांजवेळ*
बहरलेला प्राजक्त
निरवं ही सांजवेळ.
अपुल्या प्राक्तनाचा
इथेच बसला मेळ.
*प्राजक्ता आर. खांडेकर, नागपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿☄️🌔☄️➿➿➿➿
*सांजवेळ*
चल जाऊ नदी किनारी
होताच सांजवेळ सजनी
मावळतीच्या सुर्यासंगे..
घेवू फेरफटका मारूनी
*चंदू डोंगरवार अर्जुनी मोर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह.*
➿➿➿➿☄️🌔☄️➿➿➿➿
*सांजवेळ*
सांजवेळ होताच परतीला
निघतात पशुपक्षी हे सारे
किमया निसर्गाची कशी ही
घोंघावणारे सुद्धा थमती वारे
*दत्ता काजळे, उस्मानाबाद*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿☄️🌔☄️➿➿➿➿
*🚩कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य प्रशासक राहुल पाटील 7385363088 वर यांना ३.०० पूर्वी पाठवावे. (सूचना: ३१ मार्च रोजी ज्यांचे वार्षिक सभासदत्व संपले आहे. अशा सभासदांनी पुनर्नोंदणी करावी. ३.०० नंतर छायाचित्र पाठवून समुहाचा अपमान करू नका)*
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿➿
*सांजवेळ*
*रोज सांजवेळ होताच*
*आठवण तुझी येते*॥
*हळूच तुझी सय मला*
*गतस्मृतींत नेते*॥॥॥॥
*डाॅ.नझीर शेख राहाता*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿☄️🌔☄️➿➿➿➿
*सांजवेळ*
उन्हाने करपते काया
जीवन-मरणाचा चालू खेळ
न घालविता वेळ वाया
अनुभवावी सुखद *सांजवेळ*
*श्री नितीन झुंबरलाल खंडागळे*
*अंबरनाथ जि. ठाणे*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿☄️🌔☄️➿➿➿➿
*सांजवेळ*
रम्य अशी सांजवेळ
आली तुझी आठवण
कायमस्वरूपी केली
मनामध्ये साठवण
*विनायक कृष्णराव पाटील बेळगाव*
*©मराठीचे शिलेदार समूह सदस्य*
➿➿➿➿☄️🌔☄️➿➿➿➿
*सांजवेळ*
*सांजवेळ होताच क्षणी सदैव*
*आई देवापुढे दिवा लावायची,*
*आमची सर्वांची एकत्र प्रसन्न*
*घरी तर शुभंकरोती व्हायची.*
*श्री.रविंद्र भिमराव पाटील.*
(सुरभि पाटील)
४,शारदानगर, चोपडा,
ता.चोपडा, जि.जळगांव.
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿☄️🌔☄️➿➿➿➿
*सांजवेळ*
तो गंध मनात दरवळणारा
सांजवेळी अलगद उभरतो
शोधून तुला या ह्रदयात
तुझ्याच छायेत विसावतो
*कु. घुमरे राजनंदिनी प्रदिप, बीड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿☄️🌔☄️➿➿➿➿
*सांजवेळ*
*ना दिवस ना रात्र,*
*अशी सांजवेळ,रोज येते..,*
*जीवनाच्या क्षणभंगुरत्वाची जाणीव,*
*रोज मानवा,करुनी देते….!*
*कवी श्री.मंगेश पैंजने सर,*
*ता.मानवत,जिल्हा-परभणी,*
*© सदस्य, मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿☄️🌔☄️➿➿➿➿
*सांजवेळ*
सूर्याच्या उलगडल्या सुंदर रंगछटा
नील आकाशी खुले सांजवेळ
नात्यांची जोपासावी आपुलकी वीण
वृध्दत्वाच्या सांजवेळी जमवावा मेळ
*सुनीता पाटील*
जिल्हा अहमदनगर
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*