बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेतील विजेत्यांच्या रचना

➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध ८५ साठी साहित्य पाठवून उपकृत करावे*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*सांजवेळ*पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

सांज सावळी सावळी
शामरंगी रंगलेली
जशी राधेची माधुरी
भूल मनाला पडली

रंग क्षितीजी सांडता
चित्रशिल्प आकारते
नुपुरांची रुणझुण
सांजवेळ नादावते

सांज नटते सजते
प्रीतखुणा ही शोधते
गंध चंदनी लेवूनी
हास्य गाली विलसते

पाखरे गाती तिच्यासवे
वात लहरी धुंदावती
दूर कदंबाच्या तळी
हरी बासरी नादावती

सांजरंग क्षितीजाचे
लहरती जलावरी
सांज बिंब शोभले
त्या रंग तरंगांवरी

गाईगुरे परतती घरी
घुंगुरांच्या स्वरावली
पायवाटा नादावती
वृंदावनी तेजावली

केशरी सडा शिंपला
मंदिरी घंटारव घुमला
भावभक्तिच्या संगमी
अणू रेणू नादावला

*रचनाःवृंदा(चित्रा)करमरकर सांगली,जिल्हा ःसांगली*
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿☄️🌔☄️➿➿➿➿
*सांजवेळ*

दिसं कसाबसा गेला,
आता झाली सांजवेळ
मायच्या वाटेकडं लागलं,
तिच्या तान्हुल्याचं डोळं ||

रोज सकाळीच जाते,
बाळा पाळणाघरात ठेवून
डोळे सुजतात मग,
मायच्या आठवणीत रडून ||१||

मुलं आली शाळेतनं,
पक्षी परतले घरट्यांत
आई येईना लवकर,
पाणी छोटयाच्या नयनांत||२||

आली धावतं माऊली ,
घेतलं बाळाला मिठीत
अश्रूंची होती फुले,
खुलल्या कळ्यां ओठांत||३||

नोकरदार महिलांची ही,
रोजचीच कातरवेळ,
माऊलीच्या भेटीसाठी
तिचं कासावीस होतं बाळं||४||

*सौ. शारदा राहुल शिंदे*
वाई सातारा
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿☄️🌔☄️➿➿➿➿
*सांजवेळ*

सांजवेळी उन्हे
सोबत सोडूनी
वनवासी जाती
थकलेल्या जीवाला
आराम सांजवेळ देती
आयुष्याची गोडी
कळे सांजवेळी
मोकळा मिळे वेळ
आवड जोपासण्यासाठी
ह्या सांजवेळी
पक्षी जाती आपल्या
आनंदी घरट्याकडे
सांजवेळी सोबतीला
समुद्राच्या लाटा
करिती सोबती

*कु.कशमिरा उल्हास गुप्ते*
*मुंबई दादर*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿☄️🌔☄️➿➿➿➿
*सांजवेळ*

मावळतीचा तो दिनकर
पसरवून सोनेरी आभा
विसवण्या रजनीच्या कुशीत
रेंगाळत क्षितिजावर उभा

क्षणाक्षणाला ती सांजवेळ
बदलत होती आपले रूप
केशरी पिवळ्या सुंदर रंगात
खुलून आले अवणीचे स्वरूप

अंबरात पसरायला लागली
चादर हळूहळू अंधाराची
सांजवेळ पाहून आपसूक
सर्वांना ओढ लागली घराची

आकाशात उंच भरारी घेणारे
परतीच्या वाटेला लागले थवे
घराकडे परतण्याची लगबग
डोळयांत उद्याचे स्वप्न नवे

उष्ण झळा ही विसावल्या
करून अंगाची लाहीलाही
चांदण्याचा शीतल प्रकाश
सांजवेळेने घडवली नवलाई

*सौ अनुराधा बाबाराव भुरे,नांदेड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿☄️🌔☄️➿➿➿➿
*🚩कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य प्रशासक राहुल पाटील 7385363088 वर यांना ३.०० पूर्वी पाठवावे. (सूचना: ३१ मार्च रोजी ज्यांचे वार्षिक सभासदत्व संपले आहे. अशा सभासदांनी पुनर्नोंदणी करावी. ३.०० नंतर छायाचित्र पाठवून समुहाचा अपमान करू नका)*
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿➿
*सांजवेळ*

लाल तांबूस छटांनी
क्षितिजास त्या ग्रासले
कललेल्या सावल्यांचे
रंग तिथे विसावले

समन्वय रात्र दिन
सूर्य अस्तास जाताना
आठवांची ती चाहूल
परतीच्या पावलांना

घरट्यांची ओढ लागे
निघे थवाच पक्षांचा
गुरे ढोरे परतते
रव घुमतो घंट्याचा

रम्यवाटे सायंकाळ
दिवा लागणीची वेळ
म्हणू शुभमं करोति
अशी हीच सांजवेळ

चुली पेटता गावात
तवा ठेवी भाकरीला
गाय दोहणीची वेळ
दुघ देई लेकराला

लाल किरणे भानूची
होता आड क्षितिजांच्या
वाटा समोर दिसती
वापसीच्या प्रवासाच्या

*रेखा सोनारे*
ता जि नागपूर
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿☄️🌔☄️➿➿➿➿
*सांजवेळ*

मावळतीच्या सोनेरी किरणांनी सांजवेळ मोहरली
वसुंधरेच्या कुशीत सारी सृष्टी विसावू लागली

तिन्ही सांजेला वाऱ्याची मंद झुळूक दारावरून गेली
तुझ्या वाटेकडे लागले डोळे अंतरी वेदना कळवळली

सांज गेली टळून अलगद निशा ही अवतरली
आठवणींचे भरले आभाळ अन नयन कडा ओलावली

परी अचानक गर्द काळोखात दिसली एक सावली
चंद्र आला सोबतीला गाली पसरली लाली

चंद्राच्या त्या शितल प्रकाशात चमकली तुझी तेजस्वी मूर्ती
अन वाटू लागले मज झाली स्वप्नांची पूर्ती

अशी सरली ही सांजवेळ, पसरले अंधाराचे जाळे
तुझ्या माझ्या मनोमिलनाचे सृष्टीला लागले डोहाळे

*सौ अनिता व्यवहारे*
*ता श्रीरामपूर जि अहमदनगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿☄️🌔☄️➿➿➿➿
*सांजवेळ*

सांजवेळ ती निघून गेली
ठेवून एकटे सोडून गेली

काळ निघून गेला
घर काळजात करून गेला
नावाचं तिच्या स्वप्न
सदैव तेवत ठेवून गेला

सांजवेळ ती निघून गेली
ठेवून एकटे सोडून गेली

भावनाचे आश्रू गाळून
आश्रूचे मन दुःखावून गेला
आठवात तिच्या आता
वाट पाहायला लाऊन गेला

सांजवेळ ती निघून गेली
ठेवून एकटे सोडून गेली

शब्द ही मुक झाले
विरहात वाहून गेले
स्वप्नही दुःखी झाले
वेदनेत नाहून गेले

सांजवेळ ती निघून गेली
ठेवून एकटे सोडून गेली

श्वास ही तेथेच थांबले
वाट पाहून थकून गेले
आश्रूही सुकून गेले
रडून काळीज कोरडे झाले

सांजवेळ ती निघून गेली
ठेवून एकटे सोडून गेली . . .
काळ निघून गेला
घर काळजात करून गेला ….

*विजय शिर्के*
बजाजनगर , छ. संभाजी नगर .
*© सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿☄️🌔☄️➿➿➿➿
*सांजवेळ…*

झाली आता सांजवेळ
माता निघाली घरा
झपझप पडती पाऊले
शोधती नजर लेकरा

दिसता नजरेस तान्हुला
जीव भरूनिया जाई
मनीची असह्य घालमेल
क्षणार्धात शांत होई

माता येता जवळी
धावत जाई तान्हुला
शिरे अलगद कुशीत
पान्हा फुटतो मातेला

मायलेकरच्या नेत्री
वाहतो हर्ष सारा
भिजूनीया जाई दोघे
शांती लाभे अंतरा

*फुलवरे चंद्रकांत खेमाजी*
*जि.हिंगोली*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿☄️🌔☄️➿➿➿➿
*सांजवेळ*

मखमली सांजवेळी
तुझा हात हाती आहे
सागराच्या वाळूवरी
मयुराची नक्षी पाहे….

मखमली सांजवेळी
पक्षी घराकडे परतले
चोचीतुनी चारापाणी
पिलांसाठी आणलेले….

मखमली सांजवेळी
सांज जरा झुकलेली
वसुंधरा अन वृक्षवेली
सोन किरणात नहाली….

मखमली सांजवेळी
सांजवात देवापुढे
दिवबत्ती घरादारा
गायगुरे हो घरापुढे….

सांजवेळ ही सुरम्य
सारी एकत्र नांदती
संजवेळी मुले आपली
घरातच खेळण्या रंगती…

*वसुधा नाईक, पुणे*
*©सदस्या मराठीचे शिलदार समूह*
➿➿➿➿☄️🌔☄️➿➿➿➿
*सांजवेळ*

होता रोज सांजवेळ
घरा लक्ष्मी आगमन
लावी दिवा देवापुढे
बाल गोपाळ करते नमन..

येता परतूनी सारे माघारी
पक्षी नभीचे घरट्यात
रानची गाईगुरे मग सारी
धावती बीगिनी गोठ्यात…

दिवसभर काम करून
जाई माणूस थकून भागून
कष्ट करुनी घेई धाव
ओढ घराची येई परतून..

फुले जाई जुई अंगणी
करी गंधित सारी सांजवेळ
साजरा परिसर दिसे नयनी
निसर्गाचा हा सुंदर खेळ…

सांजवेळ तळपून दिनी
सूर्य नारायण जातसे अस्ताला
लाल भडक गोळा दिसे
रंग उधळण करताना

वाट पाहता पाहता
साजन आता येणार
झाली बघा सांजवेळ
मनी वाटे हूर हूर

अन्नपूर्णा करी स्वयंपाक
होता तिन्ही सांजवेळ
करी काळजी कुटूंबाची
वाढे प्रेम मनोभाव

*श्रीमती वर्षा मोटे*
छत्रपती संभाजी नगर
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह..*
➿➿➿➿☄️🌔☄️➿➿➿➿
*सांजवेळ*…

मावळतीला झुकला रवी, तप्त उन्हे सौम्य झाली
कुंद जाहल्या दाही दिशा, सांजवेळ दाटून आली..//

लांबच लांब होता होता, अंतर्धान झाली सावली
मग रानभर पांगलेली,पाखरे घरट्याकडे धावली..//

धुसर संधीप्रकाशात, लगभग बाया बापड्याची
चूल मूलाची सय येई, सोय भाकरी तुकड्याची..//

शिवारातल्या वर्दळीने, आता वस्ती जवळ केली
इकडे रातकिड्यांची फौज, गस्तीस निघून गेली..//

स्तब्ध झाल्या पायवाटा, सारी मंदावली वहिवाट
हळू हळू सृष्टीवरती, दाटू लागे काळोख घनदाट//

संथ झाल्या दिनचर्येस, मिळेल आता पूर्णविराम
निद्रादेवीच्या कुशीत सारे, घ्या रे जीवांनो आराम.//

*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿☄️🌔☄️➿➿➿➿
*सांजवेळ*

सांजवेळी हा शांत किनारा
भाळी कुंकुम तिलक लावला
झालर सोनेरी चढवत ढगांना
सुर्य जाई अस्ताला

पक्षी येती घरट्यात परत
वाजती गळ्यातील घुंगुर माळा
धूळ उडवीत येती जनावरे
भेटती अपुल्या गोंडस बाळा

कामे संपवून घरी परतायची
प्रत्येकाला असे घाई
दिवसभराचा क्षीण,थकवा
घरटे दिसता निघून जाई

मंदिरात चाले घंटारव
पूजा ,आरती,मांदियाळी
सारे होती घरट्यात शांत
सारे सुखावती सांजवेळी

*सौ.शशी मदनकर ,ब्रम्हपुरी*
*©सदस्या _मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿☄️🌔☄️➿➿➿➿
*सांजवेळ*

संसार रथ चालविला
एकमेकांच्या साथीनं
कर्तव्य पार पाडले
जीवनात नेटानं

काही कमी पडू
दिलं नाही मुलांना
पण याचा विसर
पडला आपल्या पिल्लांना

पंख फुटले त्यांना
गेली दूर उडुनी
जन्मदात्यांना गेली
ती पार विसरूनी

भवितव्य घडविताना
केली नाही मौजमजा
खस्ता खाल्ल्या किती
मिळाली वार्धाक्यात सजा

आयुष्याच्या सांजवेळी
झालो दोघे निराधार
आता आपणच देऊ
एकमेकांना आधार

*सौ.प्रांजली जोशी, विरार, पालघर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿☄️🌔☄️➿➿➿➿
*सांजवेळ*

सांजवेळ ही झाली
घरट्यात परतूनिया
चिमण्या पाखरांची
येण्याची वेळ झाली

ओढ लागते गाईला
गोठ्यातील वासराची
हांबरते वासरू आहे
वेळ झाली पान्ह्याची

माता झपझप टाकी
पाऊले ओढ घराची
चीलेपिले वाट पाहती
माता घरला येण्याची

सांजवेळ झाली तरी
बाप घरी आला नाही
विचार करी पोरे बाळे
हुरहूर ती लागून राही

सांजवेळ झाली तरी
लगबग सुरू कामाची
काबाडकष्ट करी शेती
भाकरी खाई घामाची

सांजवेळ होताच कसं
घरीदारी यावं परतुनी
मातापित्यांच्या विश्वास
टिकवा तुम्ही लेकरांनी

*✍️बी एस गायकवाड*
*पालम परभणी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿☄️🌔☄️➿➿➿➿
*सांजवेळ*

मावळतीला निघता दिनमनी
केशराची उधळण झाली
काळोखाला बिलगून उराशी
हळवी सांजवेळ आली

लांबलेली सांजसावली
घट्ट उन्हाशी बिलगली
लेकराच्या ओढीने पाखरं
परतीला घरट्याकडे निघाली

हंबरले वासरू गोठ्यात
पान्हा मायेला फुटला
धाव घेई वेगे धेनू
गागरा आसमंती भिडला

मंद मंद नंदादिपाने
देवंगाभारा उजळला
अंगणातला अबोल चाफा
मनोमनी गंधाळला

सुन्या झाल्या पायावाटा
दाटला संधीप्रकाश
चोर पावलांनी येणार
आता काळोख सावकाश

विसाव्याची वेळ ही आली
पाखरं घरट्यात परतली
थकलेली लेकरं सारी
निद्रेच्या कुशीत विसावली

*सौ. इंदू मुडे, ब्रम्हपुरी*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿☄️🌔☄️➿➿➿➿
*सांजवेळ*

नको खेळ खेळू अश्या सांजवेळी
फुकाचे बहाणे अश्या सांजवेळी

कसे वेड लागे तुझ्या लाजण्याचे
नको पाश शहाणे अश्या सांजवेळी

दुराव्या म्हणावे जरा दुर जा तू
नको फूल माळू अश्या सांजवेळी

नको ना छळू आज या मनाला
मळभ दूर व्हावे अश्या सांजवेळी

नको खेळ खेळू अशी विस्तवाशी
नको राख होणे अश्या सांजवेळी

ढळावी न पुन्हा अशी सांजवेळ
मनाने जुळावे अश्या सांजवेळी

*डॉ.सौ.मंजूषा साखरकर*
*ब्रह्मपुरी जि.चंद्रपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿☄️🌔☄️➿➿➿➿
*सांजवेळ*

क्षितिजाच्या गाभाऱ्यात
रविराज विसावले
लाल सोनेरी शेला
मावळतीला विसरले.

सोनपावली उतरली
सांज सावळी दारी
सांजवातिच्या प्रकाशात
डुले तुळस मंजिरी.

रान पाखरांचा थवा
घरट्यात परतला
पिलांचा चिवचिवाट
पानापानात मंदावला.

गायी हंबरता
ओढ घेई वासरू
पान्हावल्या गायी
तृप्त कुशीत लेकरू.

कष्टनाऱ्या जीवाला
ओढ मायेच्या सावलीची
हसते घरकुल अवधे
सांजवेळ ही विसाव्याची.

*सौ विमल धर्माधिकारी*
*वाई सातारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿☄️🌔☄️➿➿➿➿
*सांजवेळ*

होता प्रभात
उदर भरण्यासाठी
घेती भरारी
दूर दूर

दिस मावळतीस
जीव कासावीस
पिल्लांचा किलबिलाट
पडता कानी

गुरांचा कळप
दूर रानीवनी
सोडून पाडसा
चरतसे

हंबरडा कानी
धेनु सावध
वायूवेगे वाट
चालतसे

मायलेकराची
कशी ताटातूट
पोट हातावरी
गरीबाचे

हाताला उरक
कामाची लगबग
कोरडे ओठ
आसुसलेले

होता सांजवेळ
ओढ जीवा लागे
आस ही मनास
लागतसे

*शर्मिला देशमुख -घुमरे, बीड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿☄️🌔☄️➿➿➿➿
*सांजवेळ*

उन्हातल्या सावलीने गारवा झोपला
भुकबळीच्या पोटाला वनवा पेटला…

खाक झाली रान सारे पेटवल्या चुली
उपवर झाल्यात शेतकऱ्यांच्या मुली….

मातीत राबूनी घाम गाळतो कितीदा
पाऊस पाण्याने पिके येतील का?यंदा…

धरणी माय ती आलीया जागरणाला
चराचरात विनंती केली पावसाला….

शिवार भरला रानोरानी नैनीताळ
पांदीतूनी गावाकडे येतो सांजवेळ..

*शिवाजी नामपल्ले*
अहमदपूर जि.लातूर
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह.*
➿➿➿➿☄️🌔☄️➿➿➿➿
*सांजवेळ*

आठवते मला ती सांजवेळ
आपलेपणाचा मोह सुटला
हातात हात घालून बसता
प्रेमाचा चहा होता संगतीला

आठवते मला ती सांजवेळ
गोंड राजाचा किल्ला छान
बुद्धलेणीचा केला विहार
प्रेमळ भक्तीचा असावा मान

आठवते मला ती सांजवेळ
फिरून फिरून होते दमले
कुशीत तुझ्या होते शिरले
शांतता चहुकडे पसरले

आठवते मला ती सांजवेळ
पुस्तकाचा वसा दिला बांधून
ओंजळ माझी टाकले भरून
आनंद अश्रू वाहते मनावरून

आठवते मला ती सांजवेळ
हळूच तु जवळी यावे
तुझ्या स्पर्शाने सख्या रे
लाजून मी पाणी व्हावे….

आठवते मला ती सांजवेळ
जानुन घेतोस माझे मन
न थकता तु दिलेली साथ
जपतोस माझ्या प्रत्येक क्षण…

*सारिका डी गेडाम, चंद्रपूर*
*©सदस्य मराठचे शिलेदार समुह*

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles