
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध ८५ साठी साहित्य पाठवून उपकृत करावे*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*चंदेरी भेट*
अपेक्षेच्या पलीकडील प्रिये
चंदेरी भेट तू दिलीस मला
आणखी काही नको संसारी
फक्त सुखी पाहताना तुला
*सौ अर्चना जगदीश मेहेर*
ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✨🌈✨➿➿➿➿
*चंदेरी भेट*
*चंद्र होता साक्षीला अन्,*
*तारकाही होत्या,फिरत भोवती…,*
*तुझी-माझी, चंदेरी भेट,*
*रातराणीही फुलली होती सभोवती…!*
*कवी श्री.मंगेश पैंजने सर,*
*ता.मानवत,जिल्हा-परभणी,*
*© सदस्य, मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿✨🌈✨➿➿➿➿
*चंदेरी भेट*
भेटता माणसातला देव
मनी भासे ती चंदेरी भेट
सोनसळी त्या आठवणी
जपू आयुष्याच्या पानी थेट
*सौ.श्वेता मिलिंद देशपांडे*
*जामनगर, गुजरात*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✨🌈✨➿➿➿➿
*🚩कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य प्रशासक राहुल पाटील 7385363088 वर यांना ३.०० पूर्वी पाठवावे. (सूचना: ३१ मार्च रोजी ज्यांचे वार्षिक सभासदत्व संपले आहे. अशा सभासदांनी पुनर्नोंदणी करावी. ३.०० नंतर छायाचित्र पाठवून समुहाचा अपमान करू नका)*
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿➿
*चंदेरी भेट*
भावना तरंग होवून धडकतात
तेव्हा गत आठवणींना उजाळते
विस्मरणातील चंदेरी भेट….
पुन्हा जगण्यास उत्साह देते
*सौ.सिंधू बनसोडे.इंदापूर.पुणे*
*©सदस्या.मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✨🌈✨➿➿➿➿
*चंदेरी भेट*
तुझ्या सोबत जगणं मरणे
एक अनोखी चंदेरी भेट
स्वप्नवत भासे सारंकांही
साक्षात स्वर्गच अवतरे थेट.
*चव्हाण बी एम परभणी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿✨🌈✨➿➿➿➿
*चंदेरी भेट*
तुझ्या प्रेमात मी
चिंबचिंब भिजू दे
हि चंदेरी भेट मझं
जन्मोजन्मी मिळू दे
*सौ.प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✨🌈✨➿➿➿➿
*चंदेरी भेट*
तुझ्या माझ्या प्रेमाची
अविस्मरणीय ही भेट
सुंदर चांदण्या रात्रीची
अनमोल चंदेरी भेट
*विनायक कृष्णराव पाटील बेळगाव*
*©मराठीचे शिलेदार समूह सदस्य*
➿➿➿➿✨🌈✨➿➿➿➿
*चंदेरी भेट*
*अगदी दूरची नातीही लगेच*
*आई सहज जोडायची थेट,*
*नात्यांमध्ये गोडवा पेरून हो*
*नातेवाईकांना देई चंदेरी भेट.*
*श्री.रविंद्र भिमराव पाटील.*
(सुरभि पाटील)
४,शारदानगर, चोपडा,
ता.चोपडा, जि.जळगांव.
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✨🌈✨➿➿➿➿
*चंदेरी भेट*
आपण सगळे शिलेदार मिळून जाऊ
या ना चंद्रताऱ्यांनाच भेटायला थेट….
किती मज्जा येईल त्यांना भेटून
खासच होईल मग चंदेरी भेट….
*सौ स्वाती तोंडे पाटील मॅडम*
इंदापूर पुणे
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✨🌈✨➿➿➿➿
*चंदेरी भेट*
स्त्री सौंदर्याचा वेगळा थाट
नजरेत दिसते प्रेमाची वाट
प्रेयसीला दिली चंदेरी भेट
संपली मनातील कडवाहट
*श्री अशोक महादेव मोहिते*
बार्शी जिल्हा सोलापुर
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✨🌈✨➿➿➿➿
*चारोळी– चंदेरी भेट*
स्मरणात जपलेली आजही
ती अकल्पित चंदेरी भेट
झंकारता तार हृदयाची
डोळ्यातून काळजात उतरली थेट
*सौ.इंदु मुडे, ब्रम्हपुरी*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿✨🌈✨➿➿➿➿
*चंदेरी भेट*
प्रीतफुले आठवणींच्या
रूपात हृदयात फुलते
कशी विसरू अजूनही
ती चंदेरी भेट स्मरते
*सो.प्रांजली जोशी, विरार, पालघर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✨🌈✨➿➿➿➿
*चंदेरी भेट*
*टिपूर चांदणी रात्र होती*
*तू डोळ्यात पहात होतीस थेट*॥
*आजही ताजी आहे मनात*
*आपुली ती चंदेरी भेट*॥॥॥॥
*डाॅ. नझीर शेख राहाता*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✨🌈✨➿➿➿➿
*चंदेरी भेट*
आठवते का ती चंदेरी भेट
दोन काठ अपुले
ऐल आणि पैल
फुल तोडलं उरलं देठ
*सौ.भावना अजय ईटकिकर*
हिंगणघाट जि.वर्धा
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✨🌈✨➿➿➿➿
*चंदेरी भेट*
चंदेरी दुनियेत राहून
बघतो वळणावर वाट
चांदण्यांच्या साक्षीने
व्हावी पहीली चंदेरी भेट
*केवलचंद शहारे*
सौंदड गोंदिया
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✨🌈✨➿➿➿➿