
हळवं नातं
हळव्या नात्याची गोफ गुंफता,
विश्वासाची डोर बांधावी,
प्रत्येक नात जपताना मग
मनाला मनाची जाण व्हावी,
तुझं माझं म्हणण्यापेक्षा,
आपलं म्हणता गोडी चढावी,
एकाने आरोळी देताच,
दुसऱ्याने साद घालावी,
ना शब्दांचे बांध असावेत,
ना शब्दांचा पूर यावा,
भावनांच्या ह्या नात्याला,
मुक्याचा आस्वाद असावा,
आंबटगोडची चव फक्त,
मनातच रहावी,
चुकूनही कधी ओठांवर,
ती येऊन न द्यावी
हळव्या नात्याला जपताना,
सगळीच चुक माफ नसावी,
पण काही वेळेला आपण,
त्या चुकांना सुटही द्यावी,
एकाने जपताना नात
दुसऱ्याने पण जपाव,
नात हळवं असलं तरी,
त्याच्यापासून सुरु होऊन,
आपल्यातच ते संपावं,
एकाने स्वाहा म्हटलं तर,
दुसऱ्याने हाताला हात,
लावून मम म्हणावं.
सविता वामन ठाणे.