
स्वप्नरंग
रात्र वेडी तो चंद्र वेडा
स्वप्नरंगातला हा खेळ सारा
कळेना चालली कुठे वाट ही
कशी आवरू भावनांचा पसारा।
घेऊनी स्वप्नरंग मन अंतरी
जागेपणीच रंगवले नयनी
निखळ तुझ्या मनात वाटे वसावे
जावे श्वासात तुझ्या मिसळूनी।
मोल तुझे मज ह्यदयांगणी
कमलपुष्प जणू हास्य तुझे
पापण्यांचा उंबरा ओलांडून
कवडसे पडे स्वप्नरंगात तुझे।
हरपुनी भान तुझी वेडी राधा
भिजली चिंब स्वप्नरंगात ती
कान्हा तू सावळा तिचा सखा रे
प्रितीत तुझ्या रे झाली बावरी ती।
प्रतिमा नंदेश्वर
ता.मूल जि.चंद्रपूर
=====