
सांजवेळ
सांजवेळ आणि प्रसन्न वाहणारा वारा.
स्पर्श होता तनुस येतोय शहारा.!धृ!
कातर वेळी या पाखरांचे तराणे.
गाई वासरांचेही गोठ्यात परतणे.
मंद दिव्यांनी उजळलाय देव्हारा.
स्पर्श होता तनुस येतोय शहारा.!1!
रविकराने केले आभा चे दान.
संद्या ने रजनीला दिला सम्मान.
शशीकराने हसून केला ईशारा.
स्पर्श होता तनुस येतोय शहारा.!2!
बाबांचे घरी कामावरून परतने.
स्वयंपाकाची लागबग न आईचे गाणे.
मुलांनी पुस्तकाचा केला पसारा
स्पर्श होता तनुस येतोय शहारा.!3!
प्राजक्ता आर खांडेकर
सुगत नगर, नागपूर
=====